शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जाबचत करणारे ‘फॅन’ही बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:39 IST

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने ‘महावितरण’च्या माध्यमातून ऊर्जाक्षम (एलईडी)‘उजाला’ योजनेची उपकरणे बाजारात आणली असून या योजनेमार्फत पहिल्या टप्प्यात कमी वॅटचे बल्बबरोबरच ट्यूब आणि फॅनही बाजारपेठेत आणले आहेत. कमी वॅटमध्ये जादा प्रकाश व विजेची ७० टक्के बचत करण्याचे तंत्र वापरले आहे.गेल्या दीड वर्षात संपूर्ण देशभरात सुमारे २७ कोटी ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने ‘महावितरण’च्या माध्यमातून ऊर्जाक्षम (एलईडी)‘उजाला’ योजनेची उपकरणे बाजारात आणली असून या योजनेमार्फत पहिल्या टप्प्यात कमी वॅटचे बल्बबरोबरच ट्यूब आणि फॅनही बाजारपेठेत आणले आहेत. कमी वॅटमध्ये जादा प्रकाश व विजेची ७० टक्के बचत करण्याचे तंत्र वापरले आहे.गेल्या दीड वर्षात संपूर्ण देशभरात सुमारे २७ कोटी ७९ लाख एलईडी बल्बची विक्री झाली आहे, तर महाराष्टÑात २ कोटी १५ लाख ६० हजार एलईडी बल्बची विक्री झाली आहे. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांत एकूण २५ लाख ८८ हजार बल्बची विक्री करण्यात आली आहे. विजेची बचत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ईईएसएल (इलेक्ट्रीक इफेक्ट सर्व्हिस लिमिटेड) या कंपनीच्या अंतर्गत ‘महावितरण’च्या माध्यमातून ऊर्जाक्षम विजेची उपकरणे बाजारात आणली आहेत.पहिल्या टप्प्यात कमी वॅटचे बल्ब बाजारात आणले, कमी वॅटमध्ये जादा परिसर प्रकाशमय होत असल्याने त्याला ग्राहकाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता सरकारने एलईडी ट्यूब लाईट आणि फॅन बाजारात आणले आहेत. नामांकित कंपन्यांकडून ही उपकरणे निर्मिती करून सरकार ती आपल्या माध्यमातून आणत आहे. शहरासह मोठ-मोठ्या गावांत ‘महावितरण’च्या केंद्रांवर ही उपकरणे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत.आता पूर्वीच्या ७ वॅटऐवजी आता ९ वॅटचे बल्ब बाजारात आणले आहेत. त्याशिवाय पूर्वीच्या पारंपरिक ट्यूबला ४० वॅट वीज खर्चिक पडत होती. ती आता एलईडी ट्यूबला २० वॅट खर्च होते तर फॅनला लागणाºया ८० वॅटऐवजी एलईडी फॅनला ४८ वॅट वीज खर्च होणार आहे. यामुळे वीज बचतीला वाव मिळत आहे. ही उपकरणे सर्व जिल्ह्यात उपलब्ध झाली असून कोल्हापूर जिल्ह्याच्या सहा तालुक्यांत विक्री केंद्रे कार्यरत आहेत.प्रारंभीच्या काळात ७ वॅट बल्बची किंमत १०० रुपये होती; पण आता नव्याने आलेले एलईडी बल्ब ९ वॅटचे असून ३ वर्षे गॅरंटीसह त्याची किंमत अवघी ७० रुपये ठेवली आहे. शासनाच्या एलईडी बल्बच्या ‘उजाला’ योजनेमुळे गेल्या दीड वर्षात देशभरात स्वत:चे जाळे निर्माण केले असून सुमारे २७ कोटी ७९ लाख ७५ हजार ४११ एलईडी बल्बची विक्री केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात वर्षाकाठी सुमारे ३६१०० दशलक्ष युनिट विजेची बचत होत आहे.होणारी बचतकमी वॅटवर जादा प्रकाश देत असल्याने त्यामुळे विजेची बचत होत आहे.वीज निर्मितीसाठी दगडी कोळशावर होणारा १४४४० कोटींचा खर्च वाचला.संपूर्ण देशभरातील ७२२७ मेगावॅटची मागणी कमी झाली आहे.सुमारे ३ कोटी टन कार्बन डायर्नडाय आॅक्साईड वायूंचे उत्सर्जन टळल्याने पर्यावरणाला हातभार लागला आहे.