शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तुडयेत अखेर बाटली आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:26 IST

चंदगड : चंदगड तालुक्यातील तुडये गावात रविवारी दारूबंदीसाठी मतदान घेण्यात आले. यात महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान करत अखेर बाटली आडवी केली. रविवारी झालेल्या मतदानात एकूण १६०४ पैकी १२४१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी आडव्या बाटलीला १०२१ तर उभ्या बाटलीसाठी फक्त १४८ महिलांनी मतदान केले. ७२ मते बाद ठरली. निवडणूक निर्णय अधिकारी ...

चंदगड : चंदगड तालुक्यातील तुडये गावात रविवारी दारूबंदीसाठी मतदान घेण्यात आले. यात महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान करत अखेर बाटली आडवी केली. रविवारी झालेल्या मतदानात एकूण १६०४ पैकी १२४१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी आडव्या बाटलीला १०२१ तर उभ्या बाटलीसाठी फक्त १४८ महिलांनी मतदान केले. ७२ मते बाद ठरली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार डी. एम. नांगरे यांनी काम पाहिले.तुडये गावात मध्यवस्तीमध्ये पी. टी. गुरव, एम. डी. हुलजी, लक्ष्मण सातेरी व दयानंद कृष्णा मोहिते यांची दारू दुकाने होती. सायंकाळाच्या वेळेत महिलांना मद्यपींच्या त्रास होत असल्याने व गावात व्यसनाधीनता वाढल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे गावात दारूबंदी करून दुकाने बंद करावीत किंवा स्थलांतरित करावीत अशी मागणी करण्यात आली होती.त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी निवडणूक घेऊन गावातील दारूबंदी करावी, असा आदेश चंदगड तहसीलदार यांना दिला. त्यानुसार रविवारी संक्रांतीदिवशी तुडये गावात मतदान घेण्यात आले.मतदानप्रक्रिया स्लीपद्वारे घेण्यात आली. रात्री ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी नांगरे यांनी निकाल जाहीर करताच समर्थक, महिला, युवक वर्ग यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मंडल अधिकारी संजय राजगोळे, तलाठी शरद नाकाडी, ग्रामसेवक यांनी काम पाहिले.शारदा बसरीकट्टी, अनिता पाटील, सिंधू हुलजी, चांगुणा मोहिते, कस्तुरी झाजरी, नंदकुमार पाटील, सभापती जगन्नाथ हुलजी, सरपंच शिवाजी कांबळे, उपसरपंच मधुकर पाटील, सर्व संस्थांचे पदाधिकारी, महिला, बचत गट, युवक मंडळांनी घेतलेल्या प्रयत्नातून दारूबंदीझाली.