शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महिनाअखेरपर्यंत ‘हेरे सरंजाम’ सातबारे निघणार :- जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 18:52 IST

हेरे सरंजाम निर्णय -- विशेष मुलाखत :- या संदर्भात त्यांच्याशी चर्चेतील मुलाखतीद्वारे संवाद साधला. यावेळी या महिनाअखेर जवळपास सर्वच जमीनधारकांच्या नावावर सातबारा निघेल. त्या दृष्टीने प्रशासनाचे युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्देहेरे सरंजाम निर्णय -- विशेष मुलाखत४८ गावांतील लोकांना मिळणार लाभ; प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : शासन निर्णय होऊन १८ वर्षे प्रलंबित असलेला चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाम जमिनींचा प्रश्न निकाली काढण्याचा धाडसी निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नुकताच घेतला आहे. याचा लाभ हेरेसह परिसरातील ४८ गावांमधील लाभार्थ्यांना होणार आहे. या संदर्भात त्यांच्याशी चर्चेतील मुलाखतीद्वारे संवाद साधला. यावेळी या महिनाअखेर जवळपास सर्वच जमीनधारकांच्या नावावर सातबारा निघेल. त्या दृष्टीने प्रशासनाचे युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले.

‘हेरे सरंजाम’ हा नेमका काय प्रकार आहे?चंदगड तालुक्यात हेरे नावाचे गाव आहे. या गावासह आसपासची ४८ गावे सावंतवाडीच्या सावंत-भोसले या सरंजामदारांना इनाम म्हणून मिळाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही गावे त्यांच्याकडे इनाम आहेत. पुढे १९५२ मध्ये सरकारने ही इनामे खालसा केले; परंतु त्यात अनेक गुंतागुंत होती. यामध्ये मूळ सरंजामदारांच्या जमिनी, मूळ कब्जेदारांच्या जमिनी, सरंजामदारांची कुळे, काही मूळ लोकांच्या जमिनी, काही लोकांच्या अतिक्रमित जमिनी, काही बेदखल कुळांच्या जमिनी आहेत. या सर्वांचा प्रश्न सर्वसमावेशकरीत्या सोडविण्यासाठी सरकारने २००१ साली शासन निर्णय घेतला.

यामध्ये सर्व प्रकारच्या जमिनीसाठी २०० पट रक्कम भरून शेती कारणासाठी जमीन वर्ग-१ करण्याचे आदेश दिले. तसेच बिगरशेती करायची असल्यास बाजारभावाच्या ५० टक्के नजराणा रक्कम भरून ती बिगरशेती करण्याची तरतूदही करण्यात आली.

या निर्णयाचा नेमका काय व कोणाला लाभ होणार?या निर्णयाचा लाभ हा हेरेगावासह हे इनाम असलेल्या आसपासच्या ४८ गावांतील जमीनधारकांना होणार आहे. या गावांमधील सुमारे ५० हजार एकर क्षेत्र हे सरंजाम इनामाखाली येते. शासनाने सर्वसमावेशक धोरण असणारा निर्णय घेतल्याने हेरेसह परिसरातील ४८ गावांमधील मूळ सरंजामदार, मूळ कब्जेदार, सरंजामदारांची कुळे, काही मूळ जमीनधारक, काही अतिक्रमण असलेले जमीनधारक, काही बेदखल कूळ जमीनधारक यांना याचा लाभ होणार आहे.

या कामाच्या निर्गतीसाठी किती अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत?हेरे सरंजामचे काम लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी २६ जानेवारीला आठ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आठ पथके तैनात करण्यात आली आहेत. गडहिंग्लज प्रांताधिकाऱ्यांसह आसपासच्या तालुक्यांमधील प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकाºयांचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक उपजिल्हाधिकाºयाला साहाय्यासाठी एक तहसीलदार, एक अव्वल कारकून, एक कारकून देण्यात आला आहे. प्रत्येक पथकप्रमुखाकडे जवळपास सात ते आठ गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक गावासाठी एक तलाठीही नेमण्यात आला आहे. या पथकांद्वारे युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.

लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार?हेरे सरंजामच्या लाभार्थ्यांसाठी सर्वसमावेशक असा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला आहे. आपण त्या संदर्भात आदेश काढले आहेत. पुढील प्रक्रिया ही उपजिल्हाधिकाºयांच्या नेतृत्वाखालील पथकांद्वारे सुरू आहे. हे काम गतीने सुरू असून या महिनाअखेर लाभार्थ्यांच्या हातात त्यांच्या नावांचे सातबारे मिळतील, असा विश्वास आहे.

जिल्ह्यात किती ठिकाणी अशा प्रकारच्या जमिनी आहेत?उत्तर : हेरे सरंजाम या प्रकारातील जमीन ही चंदगड तालुक्यातील ४८ गावांपुरतीच मर्यादित आहे; परंतु जिल्'ात इतर ठिकाणी जहागीर (कडवे), देशमुख इनाम, छत्रपती शाहू व छत्रपती राजाराम महाराज यांनी इनाम दिलेल्या जमिनी, आदी प्रकारच्या जमिनी आहेत.

धाडसाने अधिकाराचा वापरव्यापक समाजहित साधणार असेल तर महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी धाडसी निर्णय घेऊन लोकांचे प्रश्न सोडविले पाहिजेत, असे जिल्हाधिकारी देसाई यांचे मत आहे. आपला हेतू स्वच्छ आहे आणि समजा एखादा निर्णय चुकला तरी त्याला घाबरण्याचे कारण नाही, या भूमिकेतून त्यांनी अनेक वर्षे निव्वळ लोंबकळत पडलेले प्रश्न सोडविण्याचा धडाकाच लावला आहे. कोणतेही काम प्रलंबित ठेवणे व त्यासाठी लोकांनी हेलपाटे मारणे ही कार्यपद्धती त्यांना मान्य नाही, असा विचार करणारे फार कमी महसूल अधिकारी प्रशासनात आहेत.

 

हेरे सरंजामसारखा विषय अनेक वर्षे प्रलंबित का आहे? याबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली असता, ४८ गावांचा व्याप व त्या तुलनेत असणारी त्रोटक प्रशासकीय यंत्रणा, यामुळे इच्छाशक्ती असूनही संबंधितांना हा प्रश्न लवकर मार्गी लावणे शक्य नव्हते. त्या काळात संबंधित प्रांताधिकाऱ्यांनी काही आदेश दिले; परंतु जमिनी वर्ग-२च राहिल्याने त्याचा लाभ संबंधितांना झाला नाही. त्यासाठी स्वतंत्ररीत्या अधिकारी व कर्मचारी नेमून हा विषय निकाली काढणे गरजेचे होते. त्या दृष्टीने आपण निर्णय घेतला.- दौलत देसाई, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीgovernment schemeसरकारी योजना