शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनात भाग न घेतलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांना सरकारकडून प्रोत्साहन पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 17:21 IST

सिंधुदुर्गनगरी, दि. १९ : आंदोलनात भाग न घेता ज्या अंगणवाडी कर्मचाºयांनी कामकाज सुरळीत व नियमित सुरु ठेवलेले आहे, अशांना प्रोत्साहन देण्यासाठी सिंंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून अभिंनदन पत्र देण्यात आलेले आहे.अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात वाढ न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे दिनांक ११ सप्टेंबर २0१७ पासून बेमुदत अंगणवाडी बंद आंदोलन सुरु आहे, ...

ठळक मुद्देबालक, महिलांना लाभ मिळण्यासाठीच अभिनंदन पत्र देण्याची कार्यवाही : शेखर सिंहकर्मचाºयांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरुत्वरीत केंद्रामध्ये उपस्थित राहून कामकाज नियमित सुरु करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. १९ : आंदोलनात भाग न घेता ज्या अंगणवाडी कर्मचाºयांनी कामकाज सुरळीत व नियमित सुरु ठेवलेले आहे, अशांना प्रोत्साहन देण्यासाठी सिंंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून अभिंनदन पत्र देण्यात आलेले आहे.

अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात वाढ न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे दिनांक ११ सप्टेंबर २0१७ पासून बेमुदत अंगणवाडी बंद आंदोलन सुरु आहे, या आंदोलनात ज्या अंगणवाडी कर्मचाºयांनी भाग न घेता अंगणवाडी कामकाज सुरळीत व नियमित सुरु ठेवले, अशांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत दिनांक १४ सप्टेंबर २0१७ रोजी अभिंनदन पत्र देण्यात आले.

यामध्ये या बालके व महिला योजनेच्या लाभांपासून वंचित राहून त्यांना या संपाची झळ पोहोचू नये या उदात्त हेतूनेच ही अभिनंदनपर पत्र दिल्याचा उल्लेख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी या पत्रात केला आहे.

शासन निर्देशानुसार अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधन वाढीबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने शासन स्तरावरुन कार्यवाही सुरु आहे, असे असुनही अंगणवाडी कर्मचाºयांनी संप सुरुच ठेवलेला आहे. त्यामुळे एकात्मिक बाल विकास सेवा योजना व महिला व बाल विकास विभागांतर्गत ६ वर्षे वयोगटातील मुलांना पोषण आहारांतर्गत गरम ताजा आहार व सेवांवर परीणाम होऊन बालके सदर सेवांपासून वंचित राहत आहेत.अंगणवाडीतील बालके पूरक पोषण आहार, आरोग्य सेवा या सारख्या अतिमहत्वाच्या लाभांपासून वंचित राहू नयेत या दृष्टीने संप कालावधीत जिल्ह्यातील प्रकल्प कुडाळ मधील ७ व प्रकल्प कणकवली मधील २ अंगणवाडी केंद्र संबंधित अंगणवाडी सेविका / मदतनीस यांनी नियमित सुरु ठेवून या योजनेचे लाभ मुलांना देवून चांगले काम केलेले आहे. ६ वर्षे वयोगटापर्यंतची लहान बालके, गरोदर महिला, स्तनदा माता यांना पुरक पोषण आहार तसेच आरोग्य विषयक सेवा नियमित देणे त्यांचे पोषणवृध्दीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाळा ऋतुचा विचार करता या सेवा सदर लाभार्थींना नियमित देणे अत्यंत महत्वाचे व गरजेचे सुध्दा आहे.

अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरु असल्याने संपात सहभागी अंगणवाडी कर्मचाºयांनी अंगणवाडी लाभार्थींच्या सेवांचा विचार करुन त्वरीत अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित राहून अंगणवाडीचे कामकाज सुरळीत व नियमित सुरु करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केलेले आहे.