शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवी पिढी घडविताना मुलांना शिक्षणाचा आनंद द्या

By admin | Updated: March 26, 2016 00:13 IST

इंद्रजित देशमुख यांचे प्रतिपादन : ‘लोकमत’च्या ‘मिशन अ‍ॅडमिशन समर कॅम्प एक्स्पो २०१६’चा शानदार प्रारंभ

कोल्हापूर : शिकणे म्हणजे फुलणे, उमलणे आणि आपल्या आयुष्यातील सर्वांग, परिपूर्ण असा आनंद घेणे आहे. ते लक्षात घेऊन पालक, शाळांनी मुलांना शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी शुक्रवारी येथे केले.‘लोकमत’ आयोजित डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल प्रस्तुत ‘मिशन अ‍ॅडमिशन समर कॅम्प एक्स्पो २०१६’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रदर्शनाचे सहप्रायोजक नेक्सा कोल्हापूर सेंट्रल साई सर्व्हिस हे आहेत. डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनातील या कार्यक्रमास पेठवडगावच्या नगराध्यक्षा विद्याताई पोळ, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, नेक्सा कोल्हापूर सेंट्रल साई सर्व्हिस शोरुमचे मॅनेजर राजेंद्र मुसळे प्रमुख उपस्थित होते. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते फीत कापून झाले. तसेच दीपप्रज्वलन करून प्रदर्शनातील व्याख्याने, स्पर्धा, आदी कार्यक्रमांचे उद््घाटन करण्यात आले. विद्यार्थी, पालकांनी केलेली गर्दी, माहिती देण्यासाठी सज्ज असलेले स्टॉल, आकर्षक सजविलेले स्मृतिभवन अशा उत्साही वातावरणात प्रदर्शनाला प्रारंभ झाला.देशमुख म्हणाले, माणूस आतून शांत आणि स्थिर असेल तर तो जगताना प्रतिसाद देईल. मात्र, तो आतून उद्ध्वस्त असल्यास तो प्रतिक्रिया देईल. त्यावरून आपल्या मुलाला भविष्यात प्रतिक्रियावादी की प्रतिसादवादी करायचे आहे, ते निश्चित करणे गरजेचे आहे. तुमची-माझी ओढ आनंदासाठी असेल, तर तो आनंद कोणत्या गोष्टीत आहे ते समजून घ्या, असे आवाहन देशमुख यांनी केले. ते म्हणाले, विद्या मिळविण्यात आनंद असला तर, माझ्या आयुष्याची विद्या कोणती आहे ते समजून घेऊन आनंद कशातून मिळणार आहे, त्याचा शोध घेऊन त्यादृष्टीने कार्यरत राहावे.नगराध्यक्षा पोळ म्हणाल्या, पालकांना मुलांच्या शाळा प्रवेशाबाबत मार्गदर्शन करण्याची, तर शाळांना पालकांपर्यंत पोहोचण्याची संधी ‘लोकमत’ने या माध्यमातून उपलब्ध करून दिली. शिक्षण, मुले, पालक आणि शिक्षक यांचा समतोल साधणारी शाळा उत्कृष्ट ठरते. पालकांची मुले नव्हे, तर जबाबदार पिढी घडविण्याचे काम शाळांनी करावे. यावेळी डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सरदार जाधव, ‘एलिक्सर एज्युकेअर’चे संचालक विजयसिंह चव्हाण, आदी उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी प्रास्ताविक केले. वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी आभार मानले. हे प्रदर्शन उद्या, रविवारपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत सर्वांसाठी मोफत खुले राहणार आहे. (प्रतिनिधी)‘बाल विकास मंच’तर्फे आज चित्रकला स्पर्धाकोल्हापूर : रंगपंचमीबद्दल मुलांच्या मनातील कल्पना साकारण्यासाठी ‘लोकमत बाल विकास मंच’तर्फे आज, शनिवारी दुपारी चार वाजता चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. ‘माझी रंगपंचमी’ या विषयावरील स्पर्धा राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे ‘लोकमत’ आयोजित ‘मिशन अ‍ॅडमिशन समर कॅम्प एक्स्पो २०१६’ या प्रदर्शनस्थळी होणार आहे. तसेच सायंकाळी सहा वाजता व्ही. पी. कोटेकर हे ‘आयडेंटीफाय द टेक्नोक्रिएटिव्हिटी स्पार्क इन युवर चाईल्ड’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, प्रदर्शनस्थळी राजेंद्र ढवळे यांच्याकडील प्राचीन भारतीय दुर्मीळ नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात इसवी सनपूर्व, चालुक्य कालीन, यादव, सातवाहन, मुघल, बहमणी, निजामशाही, शिवशाही, संस्थानिकांच्या चलनातील दुर्मीळ नाण्यांचा समावेश आहे. डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल४८ वर्षांचा शैक्षणिक वारसा असलेल्या श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाच्या मिसेस विजयादेवी यादव प्री-प्रायमरी स्कूल, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल, आय. आय. टी. व मेडिकल अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन हजारो मुलांनी आपले करिअर पक्के केले आहे. अत्याधुनिक साधनांच्या प्रयोगशाळा, संगणक विभाग यांमुळे ही शिक्षण संस्था अव्वल ठरत आहे.एलिक्सर एज्युकेअर इंग्लिश स्पीकिंग, व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखत कौशल्य, व्होकॅ ब्युलरी व्हिटॅमिन, आदींचा विकास वेगवेगळ्या मॉडेल्स्च्या माध्यमातून या संस्थेद्वारे शिकविला जातो. पोदार इंटरनॅशनल स्कूल मुलांच्या विकासासाठी वैयक्तिक मार्गदर्शन, सीबीएसी पॅटर्नवर आधारित शिक्षण, ई-लर्निंग, आयसीटी इनबिल्ट क्लासरूम्स, ई-बुक्सच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. संजीवन नॉलेज सिटीपाचवी ते दहावी सीबीएससी पॅटर्र्नवर आधारित अभ्यासक्रम या निवासी शाळेत शिकविला जातो. २० प्रकारच्या आॅलिम्पिक दर्जाच्या खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. राज्यातील उत्तम निवासी शाळेचा पुरस्कारप्राप्त शाळा. बार्बी वर्ल्ड प्री-प्राय. स्कूल दीड वर्षावरील चिमुकल्यांच्या सुसंस्कारित सर्वांगीण विकासासाठी प्ले ग्रुप ते चौथीपर्यंत अत्याधुनिक संकल्पनांवर आधारित शिक्षण दिले जाते. १५ मुलांमागे एक शिक्षक, वैयक्तिक मार्गदर्शनासाठी बॅचमध्ये १५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.संजीवन इंटरनॅशनल स्कूलअत्याधुनिक शैक्षणिक साधनांचा वापर, पोषक आहार सुविधा, वैयक्तिक मार्गदर्शन, ग्रंथालयाची सुविधा, संगीत व नृत्यवर्ग ही शाळेची वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक वर्गात ३५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.दिशा इन्स्टिट्यूट (डायस) पूर्वी पुणे, मुंबई, दिल्ली येथेच फक्त आयआयटी, सेट, बिटस्, एनडीए, एआयपीएमटीसारख्या परीक्षांचे मार्गदर्शन मिळत होते. मात्र, दिशा इन्स्टिट्यूटतर्फे या परीक्षांचे मार्गदर्शन कोल्हापुरात दिले जात आहे. यासह आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटी फौंडेशन कोर्स दिले जाते. सहावी ते नववीसाठी मॅथ्स यंग सायंटिस्ट ही परीक्षा घेतली जाते.स्पोर्टी बिन्सया संस्थेत अडीच ते आठ वर्षांपर्यंतच्या मुलांना नऊ प्रकारच्या खेळांचे बेसिक शिकविले जाते. खेळांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्यात येतो. एकलव्य पब्लिक स्कूलसीबीएसई बोर्ड इंग्रजी माध्यमाची प्राथमिक व माध्यमिक निवासी / अनिवासी शाळा आहे. तज्ज्ञ व कुशल व्यक्तींचे मार्गदर्शन, उच्चशिक्षित अध्यापक वर्ग, रायफल शूटिंग रेंज, अडथळा शर्यत, रोप क्लाइंबिंग या खेळांचे प्रशिक्षण दिले जाते.साई सर्व्हिसेसनेक्सा मारुती सुझुुकीचे एस क्रॉस मॉडेल प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. क्रॉसओव्हर सेग्मेंटमधील सिडान व एसयूव्हीचे कॉम्बिनेशन एस क्रॉस मॉडेलमध्ये करण्यात आले आहे. अर्थसाहाय्य व कॉर्पोरेट आॅफर्स या सुविधा उपलब्ध आहेत.क्रियोन्स इंटर. प्री-स्कूलशाळेचा कोल्हापुरातील सर्वांत मोठा प्री-स्कूल कॅम्पस आहे. मोठे क्लास रूम्स, डिस्कव्हरी आयलंड संकल्पनेवर शिक्षण, ओपन एअर थिएटर, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स, ड्राईव्ह झोन ही शाळेची वैशिष्ट्ये आहेत.इंडिया फर्स्ट रोबोटिक्स रोबोटिक्ससह यंग सायंटिस्ट परीक्षेसाठी थेअरी व प्रॅक्टिकल्स्साठी समर कॅम्पचे आयोजन केले जाते. प्रोग्रॅमिंग, मॉडेलिंग, २डी, ३डी, ड्रॉइंगचे प्रशिक्षण दिले जाते.रॉयल आर्यन्स स्कूलरॉयल आर्यन्स स्कूल, पन्हाळा ही सैनिकी स्कूल पॅटर्नवर आधारित इयत्ता सहावी ते नववीपर्यंतची निवासी शाळा आहे. सैन्यदल, पोलिस व इतर प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी मुलांकडून शालेय अभ्यासक्रमासह स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते. व्यायाम, क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकासाकडे विशेष लक्ष दिले जाते.मनालया कौन्सिलिंग सेंटर बोटांच्या ठशांच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख मनालय कौन्सिलिंग सेंटरद्वारे करून दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात करिअर निवडण्यास असणारी ही प्रक्रिया सोयीस्कर ठरते. तसेच तो रिपोर्ट मराठीतून देण्याची सुविधाही आहे.रोबो लॅब रोबो लॅबमध्ये ६ ते १६ वयोगटांतील मुलांसाठी मेकॅ निकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंंगचे मूलभूत प्र्रशिक्षण दिले जाते. तसेच रोबो कसे कार्य करतो, रोबो कसा तयार करायचा याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. मुलांमधील कल्पकतेला, सर्जनशीलतेला व तांत्रिक विकासासाठी रोबो लॅबतर्फे कार्यशाळा आयोजित केल्या जातात.पन्हाळा पब्लिक स्कूलएसएससी बोर्ड आधारित अभ्यासक्रम शिकविली जाणारी ही निवासी शाळा आहे. या स्कूलमध्ये ई-लर्निंग सुविधेवर भर दिला जातो. तसेच एरोमॉडेलिंग प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. सर्व प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण, डिजिटल क्लासरूम्स, अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक शाळा ही शाळेची वैशिष्ट्ये आहेत. ‘सायकोसोशल अ‍ॅक्टिव्हिटीज’विद्यार्थी व पालकांना करिअर निवडीचा निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. शाखा निवडीपूर्वी मानसशास्त्रीय मनोमापनाने शास्त्रोक्त मदत होते. अभिक्षमता व भावनिक बुद्धिमत्तेचे मापन करण्यासाठी तसेच नववी ते १२वीच्या विद्यार्थी व पालकांसाठी ‘अ‍ॅप्टिट्युड अ‍ॅँड इंटेलिजन्स मेजरमेंट’ ही आॅनलाईन टेस्ट घेण्यात येते.मेमरी टेक्निक्सवैदिक गणित व स्मरणशक्ती कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, स्मरणशक्ती, बुद्ध्यांक, आकलनक्षमता, आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास, अव्यक्त कलागुणांच्या वाढीस मदत होते. रॉयल इंग्लिश स्कूलया स्कू लमध्ये प्ले ग्रुप ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते. व्यवसाय शिक्षण व जीवनकौशल्य यांचे प्रशिक्षण, पारंपरिक व आधुनिक खेळांचे प्रशिक्षण, वेब पोर्टलच्या माध्यमातून होमवर्क, सुसज्ज ग्रंथालय, विद्यार्थिकेंद्रित अध्यापन पद्धती ही शाळेची वैशिष्ट्ये आहेत. ब्रेनेक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट प्रत्येक मुलामध्ये शिकण्याची एक विलक्षण पद्धत व प्रभावी वृत्ती असते; परंतु पालक आपल्या मुलांची ती क्षमता न ओळखता त्यांच्यावर आपले विचार लादत असतात. ब्रेनेक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्टद्वारे मुलांच्या सामर्थ्याची, प्रगतीची व जीवनातील संधीची ओळख करून देते. चाटे ग्रुप आॅफ एज्युकेशन चाटे ग्रुप आॅफ एज्युकेशनच्या चाटे स्कूलमध्ये कोल्हापुरात प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर के. जी., सीनिअर के. जी. ते इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत वर्ग भरविले जातात. शिस्त आणि नियोजनबद्ध अभ्यासक्रमामुळे हे स्कूल अव्वल ठरले आहे. गुणवत्तेसह सामाजिक मूल्ये जोपासणारी वेगळी ओळख आहे. युरो किडस् प्री-स्कूल स्पेशालिस्ट म्हणून युरो किडस्ची ओळख आहे. या ठिकाणी लहान मुलांना खेळासोबतच अभ्यासाची गोडीही लावली जाते. मुलांना समजेल अशा भाषेत शिकविले जाते. येथील वातावरण निसर्गरम्य ठिकाणासारखे असल्याने मुलांना शाळेत जाण्याची गोडी वाढते.अक्षर संस्कार हॅँडरायटिंग इन्स्टिट्यूट लिहिण्याचा भरपूर सराव, वैयक्तिक मार्गदर्शन, कमी वेळेत सुंदर हस्ताक्षर, बौद्धिक विकास व गुणांमध्ये वाढ होण्यासाठी मुलांना ही संस्था उपयुक्त ठरत आहे.स्वयम् मतिमंद मुलांची शाळामतिमंद विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, ते स्वावलंबी बनावेत यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. शाळेत फाईल, आकाशदिवे, खडू, कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल अ‍ॅँड ज्युनिअर कॉलेज येथे मुलांच्या कला-गुणांसह त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. दप्तराशिवाय शिक्षण संकल्पनेवर भर दिला जातो. प्री-प्रायमरीपासून बारावीपर्यंतचे वर्ग या ठिकाणी आहेत. जिल्हा, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत या शाळेतील मुले अव्वल ठरली आहेत.स्मार्ट किडस् अबॅकसस्मार्ट किडस् अबॅकस माध्यमातून मुलांमधील एकाग्रता, आकलनशक्ती, श्रवणशक्ती फोटोग्राफिक मेमरीचा विकास होतो. ब्रेनमास्टरवाचलेले लक्षात ठेवणे, अभ्यासपूर्वक व्यक्तिमत्त्व विकासासाठी, एकाग्रतेसाठी माइंड पॉवर ट्रेनिंग ब्रेनमास्टरतर्फे मार्गदर्शन केले जाते. वैयक्तिक लक्ष, मर्यादित विद्यार्थी संख्या, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक ही अकॅडमीची वैशिष्ट्ये आहेत.ज्ञानयोग मंदिरम् आनंदी पालकत्वासाठी कार्यशाळा तसेच मुलांच्या बुद्धिमत्ता विकासासाठी व वर्ड स्मार्ट, तार्किक, सांगीतिक दृष्टी, नैसर्गिक व स्पर्श विषयक जाणिवांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. तसेच तबला, बुद्धिबळ, फोनिक्स, संस्कृ त, मार्शल आर्ट, नाट्य, नृत्य, आदींचे प्रशिक्षण दिले जातेएम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल नर्सरी ते दहावीपर्यंत डिजिटल क्लासरूम्स, ई-लर्निंगची सुविधा, उच्चशिक्षित अध्यापक वर्ग, तीस मुलांमागे एक शिक्षक ही या शाळेची वैशिष्ट्ये आहेत. कला, क्रीडा, संगीत नृत्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.डी डान्स झोन अकॅडमीया अकॅडमीतर्फे फ्री स्टाईल, फोक, लावणी, हिप हॉप, कथ्थक, भरतनाट्यम्, अ‍ॅरोबिक्स, आदी नृत्य प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. श्री गणेश एंटरप्रायजेस आरओ वॉटर प्युरिफायरच्या मॉडेलचे प्रदर्शन व विक्री सुरू आहे. तसेच कोणत्याही कंपनीचा वॉटर प्युरिफायर दुरुस्त करून दिला जातो. प्रदर्शनकाळात विशेष आॅफर आहे.द नीड नवनवीन शोधांच्या मदतीने वाढलेले विजेचे बिल, वजन, हॉटेल खर्च यांवर ठोस वैज्ञानिक उपाय सुचविणाऱ्या उपयुक्त वस्तू ‘द नीड’ या अनोख्या दालनात उपलब्ध आहेत.दि इमॅजिका समर कॅम्प साहसी खेळांच्या माध्यमातून निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या पन्हाळ्यातील या कॅम्पमध्ये ७ ते १४ वयोगटातील मुलांसाठी एरोमॉडेलिंग, मार्शल आर्ट, रॉक क्लाइंबिंग, ट्रेकिंग, हॉर्स रायडिंग, सेल्फ डिफेन्स, आदींचे तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाते.नामवंत शैक्षणिक संस्थांत अ‍ॅडमिशनच्या संधी कोल्हापूर : नर्सरीपासून ते दहावीपर्यंतच्या शाळाप्रवेशाची साद्यंत माहिती एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘लोकमत’ने ‘मिशन अ‍ॅडमिशन - समर कॅम्प एक्स्पो २०१६’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे. राजारामपुरीतील कमला कॉलेजजवळील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात शुक्रवार ते रविवार (दि. २७) पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सुरू राहणार आहे.