शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रेल लिपी’ वाचविण्यासाठी ‘सक्षम’ पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:49 IST

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना वाचन, लेखनाबाबत स्वावलंंबी बनविण्यात ब्रेल लिपी मोठी उपयोगी ठरणारी ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना वाचन, लेखनाबाबत स्वावलंंबी बनविण्यात ब्रेल लिपी मोठी उपयोगी ठरणारी आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून स्मार्टफोनचा वाढता वापर, त्यातील विविध अ‍ॅप्लिकेशनमुळे ब्रेल लिपीचा या विद्यार्थ्यांना विसर पडत आहे. त्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. ही लिपी वाचविण्याकरिता दृष्टिबाधितांसाठी काम करणाऱ्या ‘सक्षम’ संस्थेने पाऊल टाकले आहे.‘सक्षम’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये पाचवी ते दहावीपर्यंतचे दृष्टिबाधित विद्यार्थी हे ब्रेललिपीचे शिक्षण घेण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले. शाळा, महाविद्यालयांतील विविध परीक्षांवेळी हे विद्यार्थी लेखनिक (रायटर) सुविधेचा उपयोग करून घेत असल्यानेही काहीजण ब्रेललिपीचे शिक्षण घेण्यास महत्त्व देत नसल्याचे चित्र आहे. मात्र, दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना ब्रेललिपी उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरणारी असल्याने ‘सक्षम’ संस्थेने त्याबाबत मार्गदर्शनाचा उपक्रम गेल्या चार वर्षांपूर्वी सुरू केला. त्या अंतर्गत या विद्यार्थ्यांना ब्रेललिपीतील विविध पुस्तके, ही लिपी शिकताना येणाºया अडचणींवर मात करण्यासाठी मार्गदर्शन वर्ग असे विविध उपक्रम राबविले जातात. नव्या वर्षात ब्रेललिपीचे वाचन, लेखन स्पर्धा घेतली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला. या संस्थेचा हा उपक्रम उल्लेखनीय ठरणारा आहे.‘ब्रेललिपी’चे महत्त्व असेस्मार्टफोन, आयपॉडवर अ‍ॅडिओ क्लिपच्या माध्यमातून दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेचा अभ्यासक्रम उपलब्ध होतो. याबाबतची काही अ‍ॅप्लिकेशनही उपलब्ध आहेत. त्यातून या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगली मदत होते. परीक्षांमध्ये चांगले गुण मिळतात. मात्र, लेखन करायचे असल्यास त्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते. पण, ब्रेललिपीचे ज्ञान असल्यास स्वत:ला हव्या त्यावेळी लेखन करता येते. त्यामुळे या लिपीचे महत्त्व आहे.आता दरवर्षी होणार स्पर्धासंस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून दृष्टिबाधित विद्यार्थ्यांच्या पातळीवर ब्रेललिपीकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ब्रेल लिपी वाचविण्यासह ती विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अधिक प्राधान्याने आम्ही गेल्या चार वर्षांपूर्वी मार्गदर्शनाचा उपक्रम सुरू केला असल्याचे ‘सक्षम’चे सदस्य संतोष गाताडे यांनी सांगितले. ते म्हणाले, दृष्टिबाधित विद्यार्थी, दिव्यांगांसाठी ‘सक्षम’चे अध्यक्ष गिरीश करडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या वर्षी ब्रेललिपीचे वाचन, लेखन स्पर्धा घेतली. ही स्पर्धा आता दरवर्षी घेणार असून, तिची व्याप्ती वाढविली जाणार आहे.