शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

सक्षम नाट्यानुभवाचा प्रवास : ‘तर्पण’

By admin | Updated: November 19, 2014 23:23 IST

निर्मिती अक्षरसिंधू साहित्य कलामंच, कणकवली.

महाराष्ट्रातील ज्या गावांनी मराठी रंगभूमीवर मनापासून प्रेम जपलंय अशा गावांपैकी एक गाव म्हणजे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कणकवली. साहजिकच स्पर्धेतील कणकवलीच्या संघाचा नाट्यप्रयोग पाहण्याविषयी जाणकारांच्या मनात विशेष उत्सुकता होती. ‘तर्पण’ हे नाटक सादर करणाऱ्या ‘अक्षरसिंंधू साहित्य कलामंच’ संघाने एक सकस नाट्यानुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत यावर्षीचा स्पर्धेचा दर्जा काय असणार आहे, याची जाणीव इतर स्पर्धक संघांना करून दिली. १९७५ सालाच्या आसपास ‘घटश्राद्ध’ नावाचा एक कानडी सिनेमा आला होता. गिरीश कासारवी दिग्दर्शित या सिनेमाची मूळ कथा ज्ञानपीठ पारितोषिक विजेते साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांची होती. एका पारंपरिक वैदिक पाठशाळा गुरूकुल पद्धतीने चालवणाऱ्या पंडिताच्या मुलीचा पाय नैतिकदृष्ट्या घसरतो आणि संपूर्ण गावासाठी आदराचं स्थान असलेल्या त्या पंडिताच्या वाट्याला बहिष्कृतता येते. त्यातूनच पुढे जिवंतपणी मृत्यूनंतरचे विधी करण्यासारखे पाऊलही त्यांना आपल्या मुलीच्या बाबतीत उचलावे लागते. अशा आशयाची कथा ‘घटश्राद्ध’ मधून अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आली होती. या सिनेमाचा प्रभाव धनंजय सरदेशपांडे लिखित ‘तर्पण’ या नाटकावर ठळकपणे जाणवतो. ‘घटश्राद्ध’ हा कन्नड सिनेमा आणि अंत्यविधीवर गुजराण करणाऱ्या बाह्मण समाजाचे जीवनव्यवहार यांची सांगड घालत सरदेशपांडे यांनी ‘तर्पण’ची संहिता लिहिलेली आहे. नाटकातील बहुतेक सर्व प्रसंग हे एकतर जिथे मृतांसाठीची क्रियाकर्मे केली जातात तो घाट, नारायण गुरूचे घर आणि नारायणच्याच घरातील वरच्या मजल्यावर क्रियाकर्मासाठी येणाऱ्या यजमानांसाठीची खोली यामध्ये घडतात. यासाठी आवश्यक नेपथ्य करताना संजय राणे यांनी रंगमंचाच्या डाव्या बाजूला इंग्रजी एल आकाराची रचना करून नारायण गुरुच्या घराच्या ओसरीचा आभास देण्यात यश मिळवले, तर उजव्या बाजूला असलेल्या थोड्याशा उंच प्लॅटफॉर्मला आवश्यक त्या दृश्यांवेळी एक चौकट लावून वरच्या मजल्यावरील खोलीचे रूप देण्यात येत होते. ज्यावेळी घाटावरची दृश्ये सादर करायची त्यावेळी प्लॅटफॉर्मवरच्या लाकडी चौकटी हलवून मागे घाटाचा आभास निर्माण करणारा पडदा वापरण्यात येत होता. नाटकाचे दिग्दर्शक आणि प्रमुख कलाकार सुहास वरूणकर यांनी सर्व कलाकारांकडून कसून मेहनत करून घेतली आहे. नाटक सुरू होतं तेव्हा नारायण गुरूचा एकूण त्या गावातील क्रियाकर्म विधीबाबतच्या अधिकारातील वरचष्मा जाणवणे आवश्यक होते. कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेटणाऱ्या अशा ब्राह्मणाची व्यक्तीरेखा उभी करण्यात वरूणकर तसूभरही कमी पडले नाहीत. दुसऱ्या अंकात आपल्या मुलीचा म्हणजे राधाचा पाय घसरल्याने आणि ती गरोदर राहिल्याने घायाळ झालेला व समाजाने बहिष्कृत केलेला बाप वरूणकरांना साकारावा लागला. नाटकाच्या क्लायमॅक्समध्ये राधाला फसवणारा दिगंबर गुमास्ते आपल्या पत्नीचे क्रियाकर्म करण्यासाठी म्हणून पुन्हा गावात येतो तेव्हा त्यानं केलेल्या प्रतारणेचा सूड म्हणून दिगंबरला जिवंतपणी मरणयातना भोगाव्या लागाव्यात यासाठी राधा आपल्या वडिलांकरवी व मुलाच्या हातून दिगंबरचा क्रियाकर्मविधी घडवते. या प्रसंगी आपल्या मुलीच्या या निर्णयाला साथ देण्यापर्यंतचा अभिनयाचा प्रवास सादर करणे हेही एक आव्हानच होते. नारायण गुरुच्या आईची भूमिका सौ. सुप्रिया प्रभुमिराशी यांनी अनेक बारकाव्यांसह व्यावसायिक कलाकाराच्या ताकदीनं रंगवली. राधाच्या भूमिकेत सौ. प्रणाली चव्हाण यांनी आपल्या परीनं रंग भरला. विठ्ठल गुरूची भूमिका शेखर गवस यांनी ठाकठीक केली. एकूण काय तर चांगला अभिनय त्याला पूरक तांत्रिक बाजू आणि ‘घटश्राद्ध’ वरून प्रेरित का असेना, पण चांगले काहीतरी पाहिल्याचा अनुभव देऊ शकेल, अशी संहिता यांचा योग्य मिलाफ झाला तर नाट्यानुभव कोणत्या पातळीवर नेऊन ठेवता येऊ शकतो, याचे दर्शन ‘तर्पण’ने घडवले.‘तर्पण’ - निर्मिती अक्षरसिंधू साहित्य कलामंच, कणकवली.नाटककार - धनंजय सरदेशपांडे, दिग्दर्शक सुहास वरूणकर, नेपथ्य संजय राणे, प्रकाशयोजना किशोर कदम, दादा कोरडे, पार्श्वसंगीत संतोष कदम, अमर पवार, रंगभूषा,वेशभूषा दुर्गेश वरूणकर, समीर प्रभुमिराशीपात्रपरिचय - नारायण गुरू सुहास वरूणकर, विठ्ठल गुरू शेखर गवस, शास्त्री शंकर सावंत, आजी सौ. सुप्रिया प्रभुमिराशी, राधा सौ. प्रणाली चव्हाण, दिगंबर विवेकानंद वाळके, मारूती प्रमोद तांबे, केशव उन्मेश कोरडे, गणेश निखिल घोलप, इतर विरेश एकावडे, सचिन कदम.आजचे नाटक‘प्रियंका आणि दोन चोर’ - नाटककार श्याम मनोहर, दिग्दर्शक रोहित पाटीलसंस्था - गायन समाज देवल क्लबकणकवली येथील ‘अक्षरसिंधू साहित्य कलामंच’ने सादर केलेल्या ‘तर्पण’ या नाटकातील दोन दृश्ये.