शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

कर्मचाऱ्यांचे दोन तास आंदोलन

By admin | Updated: April 8, 2015 00:36 IST

इचलकरंजी नगरपालिका : संगेवार यांना दमदाटी प्रकरण; कुंभार यांचे नगरसेवकपद रद्दची मागणी

इचलकरंजी : येथील नगरपालिकेचे आरोग्य विभागाकडील प्रभारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांना नगरसेवक मोहन कुंभार यांनी शिवीगाळ करीत दमदाटी केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी सुमारे दोन तास काम बंद आंदोलन केले. आयजीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला. आंदोलकर्ते कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात कुंभार यांच्या निषेधार्थ निदर्शने केली.दरम्यान, कुंभार यांच्या दादागिरी करण्याच्या कृत्याच्या निषेधार्थ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली. तसेच डॉ. संगेवार यांच्यावर नगरसेवक कुंभार यांनी त्यांच्या पत्नीचा विनयभंग डॉ. संगेवार यांनी केल्याची तक्रार दिल्याबद्दल कर्मचारी संतप्त झाले होते. त्यांनी त्याबाबतची नाराजी तीव्र शब्दांत व्यक्त केली. यावर नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी कुंभार यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घेतले. आज सकाळी नगरपालिका सुरू होताच कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनास सुरुवात केली. सर्व कर्मचारी प्रवेशद्वारात जमले व त्यांनी घोषणाबाजी करीत नगरपालिका दणाणून सोडली. नगराध्यक्ष बिरंजे, अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार, डॉ. सुनीलदत्त संगेवार, तसेच सभापती व काही नगरसेवक आल्यानंतर आंदोलनाचे रूपांतर द्वारसभेमध्ये झाले.आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांसमोर बोलताना डॉ. संगेवार यांनी कालच्या प्रकाराची माहिती सांगितली. आणि नगरसेवक कुंभार व त्यांच्या मुलाने गळपट धरून धक्काबुक्की केल्याचे स्पष्ट केले. यावर बोलताना अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार म्हणाल्या, नगरसेवक कुंभार यांनी केलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. याप्रमाणे महिला नगरसेविकांनी त्यांचे पती, मुले किंवा अन्य नातेवाईक नगरपालिकेकडे कामासाठी पाठवू नयेत. त्याचबरोबर नगरसेवकांनीही त्यांची मुले व अन्य नातेवाईक पालिकेत पाठवणे बंद करावे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधी तक्रार असेल तर नगरसेवक किंवा नगरसेविकांनी ती रितसरपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नोंदवावी. कुंभार यांचे पद रद्द करण्यासाठी मुख्याधिकारी सुनील पवार यांच्याकडे आपण शिफारस करू. तातडीने त्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.यावेळी कामगार नेते नौशाद जावळे, हरि माळी, संजय कांबळे, डॉ. श्रीकांत सूर्यवंशी, शंकर असगर, के. के. कांबळे, विजय राजापुरे, सुभाष मोरे, बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे, आदींची भाषणे झाली. शेवटी चंद्रकांत कोठावळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)नगराध्यक्ष, अतिरिक्त मुख्याधिकारींचा पाठिंबानगराध्यक्ष बिरंजे यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला व नगरसेवक कुंभार यांचे कृत्य चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, अन्य नगरसेवक किंवा नगरसेविकांना कृपा करून दोषी धरू नका. कुंभार यांनी केलेल्या कृत्याचा त्यांना परिणाम मिळेल.