शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार द्या, अन्यथा विमानतळावर प्रवाशी रोखू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:17 IST

कोल्हापूर : येथील विमानतळावर भूमिपूत्रांना रोजगार द्यावा, अन्यथा विमानतळावर प्रवाशांना रोखू अशा इशाऱ्याचे निवेदन शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई ...

कोल्हापूर : येथील विमानतळावर भूमिपूत्रांना रोजगार द्यावा, अन्यथा विमानतळावर प्रवाशांना रोखू अशा इशाऱ्याचे निवेदन शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना जिल्हाधिकारी देसाई यांनी या प्रश्नावर विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

सध्या विमानतळ विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये मुडशिंगी, उचगाव, सरनोबतवाडी, नेर्ली, तामगाव, गोकूळ शिरगाव गावातील शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे. याशिवाय ग्रामपंचायतच्या ताब्यातील ७५० एकर क्षेत्र विस्तारीकरणासाठी संपादित करण्यात येणार आहे. या गावातील स्थानिकांना आणि जमीन गेलेल्या कुटुंबातील सदस्यांना विमानतळावर नोकरी, रोजगार मिळावा.

विमानतळ विस्तारीकरणासाठी घेण्यात येणाऱ्या ६५ एकर जमिनीचा मोबदला बाजारभावाच्या पाचपट मिळावा, विमानतळात जमीन गेलेल्यांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळावा, विमानतळ ठिकाणी नोकऱ्या द्याव्यात, संपादित होणाऱ्या ६५ एकरमध्ये १०० ते १२५ वर्षांपासून लक्ष्मीवाडी मातंग वसाहत आहे. हे पूर्णत: बेघर होणार आहे. त्यांचे पुनर्वसन करावे.

निवेदन देताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, राजू यादव, विराज पाटील, विनोद खोत, पोपट दांगट, प्रवीण पालव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट

भ्रष्टाचार होतो

प्रकल्पग्रस्तांचा दाखला देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करावे. सध्या काही ठिकाणी दाखला देताना अडवणूक होते. भ्रष्टाचारही होतो, असा आरोप पवार यांनी केला. यावर जिल्हाधिकारी देसाई यांनी अडवणूक करणाऱ्यांची तक्रार करावी, कारवाई होईल असे सांगितले.

फोटो : २४०६२०२१-कोल- शिवसेना निवेदन

उजळाईवाडीतील विमानतळावर भूमिपूत्रांना रोजगार, नोकऱ्या द्याव्यात, यासह विविध मागण्यांचे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.