ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून गावागावांत महिला बचत गटाचे जाळे विणून महिलांना स्वयंरोजगारातून स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम केलेल्या वाशी (ता. करवीर) येथील उदयोन्मुख नेतृत्व म्हणजे उदयानीदेवी हिम्मतराव साळुंखे वहिनी (सरकार) यांच्या वाढदिवसानिमित्त....
साळुंखे वहिनी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना सहकाराची जोड देऊन गावागावांत महिलांचे
संघटित करून बचत गटाचे जाळे निर्माण केले. महिलांचा सक्षम विकास होण्यासाठी त्यांनी महिला बचत गटांना शेळीपालन, दुभती जनावरे व इतर स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदरात कर्ज पुरवठा व शासकीय योजना उपलब्ध करून दिल्या. शासकीय योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांचा विकास हेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून अहोरात्र काम केले आहे. वहिनींचे माहेर व सासर सरकार घराणे असले तरीही कधीही गर्व केला नाही. त्यांनी समाजकार्याबरोबर राजकीय जीवनात वाटचाल करत असताना जनताच केंद्रबिंदू मानून आपली घोडदौड सुरू ठेवली आहे. अडचणीत सापडलेल्या स्त्रियांना आर्थिक साहाय्य करून मायेची ऊब देण्याचे काम केले आहे. करवीर विधानसभा मतदारसंघात महिलांच्या विकासासाठी व तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार पी. एन. पाटील यांच्या माध्यमातून रोजगार शिबिरे घेऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. सामान्य माणूस उभा करण्यासाठी काँग्रेसची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला. काँग्रेस पक्षाशी असलेली त्यांची निष्ठा व सामान्य जनतेच्या विकासासाठी असणारा कळवळा व आस्था यांची दखल घेऊन पक्षाने कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्षपद, महाराष्ट्र राज्य ग्राहक संघाच्या प्रांत उपाध्यक्ष पदावर सर्वसामान्य जनतेसाठी काम करत आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका म्हणून गेली सहा वर्षे काम करत आहेत. त्यांना वाढदिनाच्या लाख-लाख शुभेच्छा.
संकलन बाबूराव चव्हाण
कांडगाव, ता. करवीर