शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे कर्मचाऱ्यांना कोंडले

By admin | Updated: November 16, 2016 00:41 IST

निढोरीतील घटना : कालव्याला पाणीच नाही; शेतकऱ्यांचा उद्रेक

म्हाकवे : पाण्याच्या बाबतीत नेहमीच हेटाळणी करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांबाबत म्हाकवे, बानगे, आणूरसह सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये संताप खदखदत होता. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आम्हाला पाणी का मिळत नाही? केवळ पाणीपट्टीच वसुली करीत राहणार काय? असे प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी काही संतप्त शेतकऱ्यांनी निढोरी कार्यालयाला टाळे लावून सर्वच कर्मचाऱ्यांना काही काळ कोंडले. येथील शेतकरी कालव्यातून पाणी मिळत नसल्याबाबत वारंवार टाहो फोडत असतानाही प्रशासन याकडे कानाडोळा का करते, हा मुद्दाच अनुत्तरित आहे. काळम्मावाडी धरणाच्या निढोरी कालव्यातून म्हाकवेकडील कालव्यात बुधवारी (दि. ९) सकाळी पाणी सोडले आहे. मात्र, हे पाणी सात दिवसांनंतरही बानगेपर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे १२ दिवसांच्या आवर्तनामध्ये बानगे, आणूर, म्हाकवेसह सीमाभागातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्याच्या आशा मावळत असल्यानेच शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळेच त्यांनी निढोरी कार्यालयावर मोर्चा काढून उद्रेकाला वाट करून दिली. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, रामचंद्र चौगुले, आदींनी केले. यावेळी आंदोलनावेळी म्हाकवेचे उपसरपंच रमेश पाटील, विजय डाफळे, आप्पासाहेब पाटील, शहाजी पाटील, भगवान पाटील (बानगे), श्रीकांत कदम, कुंडलिक गमनिक, बाळासो मेथे (बानगे) यांसह आणूर, हदनाळ येथील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर) ‘लोकमत’चे आभार म्हाकवेसह सीमाभागातील शेतकऱ्यांनाही निढोरी उजव्या कालव्याचे पाणी मिळावे यासाठी कच्च्या कालव्याची डागडुजी, सुरुवातीच्या गावांत उपसाबंदी, नियोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करणे आवश्यक, आदी उपाययोजना सुचवत ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यामुळे येथील अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना बळकटी मिळाल्याच्या प्रतिक्रियाही शेतकऱ्यांनी व्यक्त करून आभार मानले. १२ दिवसांच्या आवर्तनामध्ये बानगे, आणूर, म्हाकवेसह सीमाभागातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्याच्या आशा मावळल्या सात दिवसांनंतरही पाणी बानगेपर्यंंत पोहोचले नसल्याने उद्रेक