शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

..अन्यथा एक डिसेंबरनंतर उग्र आंदोलन;सकल मराठा समाजाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:05 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारने सभागृहात सादर केला नाही. दोन दिवसांत अधिवेशन संपणार आहे. एकूणच पाहता, आरक्षण देण्याबाबत ...

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारने सभागृहात सादर केला नाही. दोन दिवसांत अधिवेशन संपणार आहे. एकूणच पाहता, आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारची चालढकल सुरू आहे. आगामी दोन दिवसांत सरकारने आरक्षण जाहीर करावे, अन्यथा दि. १ डिसेंबरनंतर सकल मराठा समाजातर्फे उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, अशा इशारा सकल मराठा समाजाचे सचिन तोडकर आणि स्वप्निल पार्टे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.तोडकर म्हणाले, सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे. त्याबाबत दोन दिवसांत कार्यवाही करावी; अन्यथा सध्या सुरू असलेल्या उपोषणाचे रूपांतर उग्र स्वरूपाच्या आंदोलनामध्ये होईल. समाजबांधव रस्त्यांवर उतरून सरकारला त्रासदायक होईल, असे सर्व काही करतील.पार्टे म्हणाले, आमरण उपोषणाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त, डॉक्टरांची व्यवस्था केलेली नाही. आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असताना दसरा चौकात बंदोबस्त ठेवण्याचे कारण काय? पोलीस प्रशासनाने जाणूनबुजून आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यास भाग पाडले आहे. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत.