शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’साठी आज एल्गार

By admin | Updated: November 5, 2015 23:50 IST

‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदेकडे लक्ष : जयसिंगपुरात एक लाख शेतकरी येणार

जयसिंगपूर : खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आज, शुक्रवारी होणाऱ्या चौदाव्या ऊस परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे. या हंगामात एकरकमी एफआरपी द्या, अशी भूमिका संघटनेची असून, ऊस परिषदेला पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातील एक लाख शेतकरी उपस्थित राहतील, असा दावा ‘स्वाभिमानी’ने केला आहे. आज दुपारी दोन वाजता येथील विक्रमसिंह मैदानावर होणाऱ्या या परिषदेत आंदोलनाची दिशा ठरणार आहे. एफआरपीसाठी संघर्ष करायला तयार राहा, असे आवाहन स्वाभिमानीने केले असले तरी कारखानदारांनी साखरेचे दर घसरल्याचे कारण सांगून एफआरपी तीन टप्प्यांत देण्याचे ठरविले आहे. यामुळे एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी आक्रमक झाली आहे. ही कोंडी कशी फुटणार याची उत्सुकता आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील अनेक साखर कारखाने वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर ठराव करून शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे मिळणाऱ्या एफआरपीचे तीन तुकडे करू पाहत आहेत. वास्तविक ऊस दर नियंत्रण अध्यादेश १९६६ नुसार उसाची एफआरपी अर्थात किमान लाभकारी मूल्य कायद्याप्रमाणे ऊस तोड झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत एकरकमी देणे सर्वच कारखानदारांना बंधनकारक आहे. एफआरपीचे तुकडे केल्यास त्याचा विपरीत परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणार आहे. एफआरपीचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न केल्यास स्वाभिमानी आंदोलन छेडेल, तसेच प्रसंगी न्यायालयातही जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यंदा एकरकमी एफआरपीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसण्याची गरज असून, कारखान्यांनी शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी, असा सूर शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून, स्वाभिमानीने ऊस परिषद यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. परिषदेला राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर आणि सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत. यंदाची चौदावी ऊस परिषद ऐतिहासिक होण्याच्या दृष्टीने स्वाभिमानीने ठिकठिकाणी मेळावे, बैठका, मोटारसायकल रॅली काढून ऊस परिषदेची शेतकऱ्यांत जागृती केली आहे. कोंडी कशी फुटणार ?: दिशा आज ठरणारएफआरपीची सर्व रक्कम देणार, पण तीन टप्प्यांत देणार, अशी भूमिका साखर कारखानदारांची आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना एकरकमी एफआरपीसाठी आग्रही आहे. केंद्रात व राज्यात भाजप सरकार असून, ‘स्वाभिमानी’ने सत्तेत असूनही आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजप सरकार ही कोंडी कशी फोडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कोल्हापूरहून विशेष पथकासह शिरोळ, हातकणंगले, वडगाव, कुरुंदवाड पोलीस ठाण्यांतील कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहने बायपास रस्त्यावरून सोडण्यात येणार आहेत, तर इचलकरंजी व जयसिंगपूरला येणारी वाहने उदगाव-शिरोळ बायपास रोडवरून सोडण्यात येणार आहेत. वाहनतळासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, दसरा चौक, मादनाईक पंप, झेले चित्रमंदिर मागे, सिद्धेश्वर मंदिर परिसरात सोय केली आहे.- संतोष डोके, सहायक पोलीस निरीक्षक, जयसिंगपूर