शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पवनचक्कीविरोधात एल्गार

By admin | Updated: February 15, 2016 01:10 IST

बोलोलीत बैठक : बारा वाड्यांंतील शेतकरी उद्या काम बंद पाडणार

सांगरूळ : सातेरी महादेवाच्या डोंगरावर बोलोली, स्वयंभूवाडी, उपवडे, आमशीच्या डोंगरमाथ्यावर रविवारी सकाळी अचानक पवनचक्की उभारणीच्या कामाला सुरुवात झाल्याचे समजताच बारा वाड्या, वस्त्यांवरील शेतकऱ्यांनी बोलोली येथे रविवारी बैठक घेऊन पवनचक्की विरोधात एल्गार पुकारला. उद्या, मंगळवारी तेथील काम बंद पाडण्याचा निर्धार केला असून, गुरुवारी शासकीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. करवीर तालुक्यातील बारा वाड्या-वस्त्यांचा लांडी खोरी या नावाने प्रसिद्ध असणारा बोलोली उपवडेसह परिसर उंच डोंगरमाथ्यामुळे प्रसिद्ध आहे. तत्कालीन मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी उपवडेत लघुपाटबंधारे प्रकल्प बांधून परिसरात हरित क्र ांती निर्माण केली. यामुळे इथला शेतकरी सधन बनला; पण चार वर्षांत डोंगरमाथ्यावर चेन्नई, सातारा, कऱ्हाड येथील कंपन्यांनी राजकीय वरदहस्ताखाली शासकीय व शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करून पवनचक्कीसाठी प्राथमिक स्वरूपाचे टॉवर उभे केले आहेत. दरम्यान, रविवारी अचानक पवनचक्कीच्या मुख्य कामाला सुरुवात करण्यात आली. यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणण्यासाठी रस्ता केला आहे, तर वेगवेगळ्या मशीनद्वारे जमिनीची व हवेच्या दाबाची तपासणी केली. दरम्यान उद्या, या प्रकल्पाचे काम बंद पाडून आंदोलन करण्याचे बैठकीत ठरले. बैठकीला महादेव राणे, चंद्रकांत शिपेकर, देवबा राणे, लहू बाटे, विलास बाटे, सुनील कारंडे, संजय कारंडे, यशवंत पाटील, कृष्णात पाटील, संभाजी इर्गुले, भरत बाटे, सागर राणे यांच्यासह धनगरवाडा, शिपेकरवाडी, आरडेवाडी, इर्गुलेवाडी, कारंडेवाडी, स्वयंभूवाडी, विठ्ठलाईवाडी, अशा बारा वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांची मागणी : दुष्काळ लादू नकागेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उपवडे तलावही पूर्ण क्षमतेने भरला नाही. दुष्काळसदृश परिस्थिती असताना पवनचक्की उभारण्याचा घाट कशासाठी? अशी शेतकऱ्यांतून विचारणा होत आहे. हा पवनचक्की प्रकल्प शासनाचा की खासगी कंपन्यांचा, हाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. सध्या या डोंगरावर शतकोटी वृक्ष लागवडीमुळे चांगले जंगल तयार झाले आहे. ही झाडे तोडून पवनचक्क्या उभा करून आम्हा शेतकऱ्यांवर दुष्काळ लादू नका, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.