शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘मोबाईल अ‍ॅप्स्’वर अकरावी प्रवेशाची माहिती

By admin | Updated: May 25, 2016 00:25 IST

राजाराम महाविद्यालय मुख्य केंद्र : केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून तयारीला वेग

कोल्हापूर : शहरातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता निर्माण करणारी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया यावर्षी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवे पाऊल टाकणार आहे. विद्यार्थी, पालकांना त्यांच्या हातातील स्मार्टफोनवर मोबाईल अ‍ॅप्स्द्वारे यंदा प्रवेशाची अद्ययावत माहिती (अपडेटस्) मिळणार आहे. त्यादृष्टीने प्रवेश प्रक्रिया समितीची तयारी सुरू आहे.अकरावी प्रवेशासाठी शहरातील ३२ महाविद्यालयांमधील यावर्षी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. या प्रक्रियेचे यंदाचे सातवे वर्ष असून राजाराम महाविद्यालय मुख्य केंद्र आहे. ओएमआर शीट, संकेतस्थळानंतर आता मोबाईल अ‍ॅप्स्चा वापर केला जाणार आहे. प्रवेश अर्ज वितरण-स्वीकृती केंद्रे, प्रवेशाचे वेळापत्रकाच्या निश्चितीवर समितीतर्फे ३१ मेच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. कोल्हापूर शहरात मराठी व इंग्रजी माध्यमांची एकूण ३२ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यांची एकत्रित प्रवेश क्षमता १३,५०० इतकी आहे. दहावीच्या गुणपत्रिका मिळाल्यानंतर साधारणत: जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान, प्रक्रियेबाबत शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी सांगितले की, गेल्यावर्षीप्रमाणे यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याच्या (६६६.८िीि‘ङ्मस्र.ङ्म१ॅ) या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेची, महाविद्यालयांची माहिती मिळेल.मोबाईल अ‍ॅप्स् ठरणार उपयुक्तप्रवेश प्रक्रियेची माहिती देणारे हे मोबाईल अ‍ॅप्स् मराठी भाषेमध्ये असणार आहे. त्यात गुणवत्ता यादी, प्रवेश मिळालेले महाविद्यालय, प्रवेशित झालेल्या जागा, आदींची माहिती मिळणार आहे. ‘गुगल’च्या प्ले स्टोअरवरून हे अ‍ॅप्स् विद्यार्थी, पालकांना विनामूल्य डाऊनलोड करून घेता येणार आहे. त्याच्या वापरासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन ते दिवसांत संबंधित अ‍ॅप्स उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी, पालकांवर मोठा ताण असतो. हा ताण हलका करण्यासाठी मोबाईल अ‍ॅप्स् उपयुक्त ठरणार असल्याचे प्रवेश प्रक्रिया समितीचे कार्याध्यक्ष डॉ. वसंत हेळवी यांनी सांगितले. ते म्हणाले, राजाराम महाविद्यालयाला यंदा पहिल्यांदाच अकरावी प्रवेश प्रक्रियेचे मुख्य केंद्र म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.