शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘अकरावी’ची प्रवेश प्रक्रिया १६ जूनपासून

By admin | Updated: June 9, 2015 01:19 IST

केंद्रीय पद्धत : उद्बोधन वर्ग शुक्रवारपासून

कोल्हापूर : दहावीचा आॅनलाईन निकाल लागल्यानंतर मुलांना आता महाविद्यालयाचे वेध लागले आहे. अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची सुरुवात १६ जूनपासून होणार आहे. शहरातील ३२ महाविद्यालयांमध्ये ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रबोधनाचे वर्ग शुक्रवारपासून (दि. १२) सुरू होतील, अशी माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष व शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी दिली.गोंधळी म्हणाले, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्या माध्यमातून तयारी सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेचे मुख्य केंद्र यावर्षी गोखले कॉलेज राहणार आहे. कोल्हापूर शहरात मराठी आणि इंग्रजी माध्यमांची एकूण ३२ कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यांची एकत्रित प्रवेश क्षमता १३ हजार ५०० इतकी आहे. दहावीच्या टक्केवारीवर प्रवेशाची सूत्रे निश्चित केली असल्याने समितीकडून वाढीव प्रवेश क्षमतेचे नियोजन करण्यात येईल. आॅप्टिकल मार्क रीडर (ओएमआर) पद्धतीने यावर्षी शहरातील अकरावीचे प्रवेश निश्चित केले जातील. विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याच्या ६६६.८िीि‘ङ्मस्र.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेची, महाविद्यालयांची माहिती ठेवली आहे. ‘एमसीव्हीसी’ अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. महाविद्यालयांना प्राधान्यक्रम देताना विद्यार्थी-पालकांनी ते लक्षात ठेवावे. महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेबाबत लिपिक, शिक्षक आणि अर्ज वितरण व संकलन केंद्रांवरील अधिकारी, कर्मचारी तसेच दहावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचे उद्बोधन वर्गाचे आयोजन केले असून हे वर्ग शुक्रवार (दि. १२) ते रविवार (दि. १४) दरम्यान घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)