संतोष पाटील -कोल्हापूर -- शासनाने कोल्हापूरच्या विकास नियंत्रण नियमावलीत बदल करून इमारतींची उंची २१ मीटरवरून ३५ मीटरपर्यंत (११ मजली) उंच करण्यास परवानगी दिली. या निर्णयानंतर मुंबई, पुणे, नाशिकनंतर कोल्हापुरात उंच इमारती दिसतील अशी आशा होती. मात्र, सध्या दोन इमारती वगळता शहरातील इमारती त्यामाने खुज्याच राहिल्या. ११ मजल्यांसाठी असणारे निकष बदलण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांतून होत आहे.अकरा मजल्यांच्या नव्या निकषांने बहुमजली इमारतींमुळे शहर देखणेपणात वाढेल. शहर आडवे वाढण्यास मर्यादा, उभे वाढल्याने जागांचे दरही आवाक्यात येतील, अशी आशा होती. मात्र, ११ मजलींला किमान दोन हजार चौ. मीटर जागेची गरज आहे. मूळ गावठाण वगळून ११ मजली इमारतीस परवानगी दिली. मूळ शहराचा ८० टक्केभाग हा गावठाणात आहे. दोन हजार चौ. मीटरच्या जागाच कमी असल्याने या इमारतींवर मर्यादा असल्याचे बांधकाम क्षेत्राचे मत आहे.अकरा मजल्यांसाठी नियमावलीमहालक्ष्मी किरणोत्सव मार्गावरील इमारतींसाठी ३५ मीटरची परवानगी नाही १ एफएसआयच परवागी, बिल्टअप एरियात कोणतीही वाढ नाही१ हजार स्के. फूट जागेवर २४ मी. उंच इमारतदीड हजार स्के. फूट जागेवर ३० मी. उंच इमारतदोन हजारच्या पुढे स्के. फूट जागेवर ३५ मी. उंच इमारतमनपाच्या फायर कॅपिटेशनमध्ये ५ रुपयांवरून १५ रुपये प्रति चौरस मीटर वाढमनपाला अग्निशमन दल सक्षम करावा लागणारबाल्कनीच्या मर्यादेत ५ टक्के वाढगावठाणमध्ये ११ मजलीला परवानगी नाही.शहरात ८० टक्के जागा गावठाणातील११ मजली इमारती भोवतालची ८० टक्के जागा खुली राहणारबगीचा, वृक्ष लागवड व दोन इमारतींमध्ये मोकळी जागा शहर हद्दवाढीनंतरच मोठ्या प्रमाणात ११ मजली इमारतीस चालना११ मजली इमारतींसमोर १२ मीटर रस्ता आवश्यकया इमारतींमध्ये अत्याधुनिक लिफ्टसह व अग्निशमन यंत्रणा आवश्यकअत्याधुनिक सोयी व नव्या निकषांमुळे या इमारती काहीशा महागड्या गावठाण व्यतिरिक्त असलेल्या जुन्या इमारतींना निकष पूर्ण केल्यानंतरच परवानगीदोन वर्षांत ७-८ इमारतींच ११ मजलीअकरा मजली इमारतींमुळे शहरच्या सौंदर्यात भर पडते. अकरा मजल्यांपर्यंत बांधकाम हे खर्चिक असते. कोल्हापूर शहराची भौगोलिक स्थिती व अकरा मजल्यांसाठी असणारे निकष यामुळे अकरा मजली इमारतींवर बंधने आहेत. रेडझोनमधील अकरा मजल्यांसाठी असणारी बंधने उठविणे गरजेचे आहे. मात्र, भविष्यात अशीच परिस्थीती राहणार नाही. कोल्हापुरातही मोठ्या प्रमाणात अकरा मजली इमारती उभ्या राहतील. - गिरीश रायबागे, अध्यक्ष- कोल्हापूर क्रीडाई
अकरा मजलीचा मार्गच खुजा
By admin | Updated: August 11, 2014 00:44 IST