शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

हत्तींचा मुक्काम आंबेरीतच वाढला

By admin | Updated: April 18, 2015 00:07 IST

अप्पर मुख्य वनसंरक्षक यांची माहिती

सावंतवाडी : आंबेरीत क्रॉलमध्ये ठेवण्यात आलेल्या ‘गणेश’ या हत्तीचा मृत्यू झाल्यानंतरही वनविभाग उर्वरित दोन हत्ती आणखी काही काळ तेथेच ठेवणार असून, प्रशिक्षणाचे अजून काही टप्पे पूर्ण व्हायचे आहेत. अन्य हत्तींसाठी प्रशिक्षण काळात दुसरी जागा बघण्यात येईल, असे मत वनविभागाचे अप्पर मुख्य वनसंरक्षक एच. एन. पाटील यांनी व्यक्त केले. ते सावंतवाडीतील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे वनसंरक्षक एम. के. राव, उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, सहायक उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी उपस्थित होते.यावेळी त्यांनी हत्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानेच झाल्याचे मान्य केले. तसेच हत्तीग्राम संकल्पना दोन हत्तींसाठी राबविणे चुकीचे असल्याचे सांगत हत्तीग्राम चर्चेलाही पूर्णविराम दिला.आंबेरी येथे तीन हत्तींना पकडून ठेवण्यात आले होते. त्यातील ‘गणेश’ नावाच्या हत्तीचा आठवड्यापूर्वी मृत्यू झाला होता. यामुळे हत्ती प्रशिक्षणावरच शंका उपस्थित करण्यात आली होती. अनेकांनी हत्तींना पुन्हा जंगली अधिवासातच सोडा, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी वनविभागाचे अप्पर मुख्य वनसंरक्षक एच. एन. पाटील यांनी आंबेरी येथे भेट दिली.त्यानंतर सावंतवाडीत बोलताना त्यांनी सांगितले की, हत्ती पकड मोहीम यशस्वी झाली. त्याला लोकांचे सहकार्यही चांगले लाभले. मात्र, ‘गणेश’ या हत्तीचा झालेला मृत्यू हा वनविभागाच्या चुकीमुळे झाला नसून, हत्तीचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानेच झाला आहे. हत्तींना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबाबत कोणत्याही त्रुटी नसून, इतर ठिकाणीही असेच प्रशिक्षण देण्यात येत असते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या तरी हत्तींना आंबेरीतून हलविण्याबाबत कोणताही विचार नसून, आम्ही नवीन जागेच्या शोधात आहोत; पण कोणत्याही निष्कर्षांपर्यंत पोहोचलो नाही. हत्तींना पहिल्या टप्प्यात तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. (प्रतिनिधी)