शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या चिखलात दादांचा हत्ती रुतणार

By admin | Updated: September 11, 2015 00:57 IST

हसन मुश्रीफ यांची टीका : पालकमंत्र्यांना उपरोधिक भाषेत प्रत्युत्तर

कोल्हापूर : ‘हाथी चले अपनी चाल, कुत्ते भौंके हजार’ असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणत आहेत. मात्र, हत्ती एकदा चिखलात रुतला की त्यास दहा क्रेन लावूनसुद्धा वर निघू शकत नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीत दादांची अवस्था चिखलात रुतलेल्या हत्तीसारखी होणार असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी प्रसिद्धिपत्रकातून केली. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर ‘हाथी चले अपनी चाल, कुत्ते भौंके हजार’ अशी उपरोधिक टीका केली होती. बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. त्यास मुश्रीफ यांनी गुरुवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले. पत्रकात म्हटले आहे, ‘पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेची निवडणूक होत आहे. वीस कोटी रुपयांचा निधी दिल्याची फार टिमकी वाजवीत आहेत. आम्ही गेल्या पाच वर्षांत ११०० कोटी रुपये आणले. अकरा महिन्यांपूर्वी त्यांनी हा विकासनिधी का आणला नाही? निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा निधी खर्च होणार का, याबद्दल साशंकता आहे. तरीही शहरवासीयांची ते फसवणूक करीत आहेत. महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीवेळी पहिल्यांदाच पक्षीय पातळीवर निवडणुका झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक स्वबळावर लढविली. जनसुराज्य व अपक्ष यांच्या पाठबळावर राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष बनला. दादा, गेल्या निवडणुकीत तुमची अवस्था काय झाली होती? या निवडणुकीत चांगली माणसे मिळणार नाहीत, म्हणून तुम्ही ‘ताराराणी आघाडी’ची साथ केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कोल्हापूर दौऱ्यामध्ये माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर केलेली टीका निषेधार्ह आहे. दानवे यांनी आपली पात्रता ओळखून पवारांवर टीका करायला हवी होती. आपल्या साखर कारखान्यासंबंधी पवार यांच्या घरी जाऊन दानवे यांनी भेट घेतल्याचे मी पाहिले आहे. दानवे यांनी आपल्या कारखान्यातील उसाला यंदा फक्त १२०० रुपये दर दिला आहे. शेतकऱ्यांची त्यांच्याबद्दलची मते वाईट आहेत. ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी संयम राखणे अपेक्षित आहे. दलाल, बाजारबुणगे अनेक वर्षांपासून सोबत असलेला शिवसेना पक्ष तुम्ही नाकारला. आम्हाला उमेदवार शोधावे लागत नाहीत. आमच्याकडे चारित्र्यसंपन्न, गोरगरीब, सामान्य यांच्याबद्दल आस्था असणारे उमेदवार मोठ्या संख्येने आहेत. आम्ही दलाल, बाजारबुणग्यांना जवळ करीत नाही, असाही टोला मुश्रीफ यांनी ताराराणी आघाडीचे नाव न घेता पत्रकात लगावला आहे.