शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीकडून वनकर्मचाऱ्यांचा पाठलाग

By admin | Updated: March 19, 2015 00:02 IST

धनगरमोळा येथील घटना : काजू, उसाचे मोठे नुकसान

आजरा : धनगरवाडी धरण परिसरात वास्तव्यास असणाऱ्या टस्कर हत्तीने धनगरमोळा गावातील शेतात मंगळवारी रात्री धुमाकूळ घालत पाम वृक्ष, केळी व ऊस पिकाचे प्रचंड नुकसान केले. हत्ती हुसकावण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांसह वनखात्याच्या कर्मचाऱ्यांचा बिथरलेल्या हत्तीने पाठलाग केल्याने आता हत्तीला आवरायचे कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हत्तीचा पवित्रा पाहून वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडून काढता पाय घेतला.सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हत्तीचे धनगरमोळा येथे आगमन झाले. शेतातील केळी, ऊस, खाल्ला व पाटील यांच्या घराजवळ आला. हत्ती घराच्या दिशेने येत असलेला पाहून हत्तीवर प्रकाशझोत टाकत फटाके वाजविण्यास सुरुवात केली. याच दरम्यान वनखात्याचे गस्तपथक धनगरमोळ्यात हजर झाले. त्यांच्याशी पाटील कुटुंबीयांनी दूरध्वनीवरून माहिती दिली. पथकातील कर्मचारी व पाटील कुटुंबीयांनी हत्तीला जंगलाच्या दिशेने हुसकावण्याचा प्रयत्न केला.पुढे जाणाऱ्या हत्तीने अचानक मागे वळून सर्वांना रोखून धरले. हत्तीची आक्रमकता पाहून सर्वांनीच पाटील यांच्या घराच्या दिशेने काढता पाय घेतला. वनपाल गवस, रमेश पाटील, प्रकाश पाटील, श्रावण कृष्णा शेटगे, बाळकृष्ण बाबूराव पाटील, आदींचा यामध्ये समावेश होता. पुन्हा रात्रभर हत्तीने काजूची झाडे, ऊस, केळी, पामची झाडे यांचे प्रचंड नुकसान केले. पहाटेच्या वेळी धनगरवाडी धरणाच्या दिशेने तो निघून गेला. (प्रतिनिधी)