शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सोने-चांदी व्यवहारात इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणे

By admin | Updated: March 25, 2015 00:40 IST

पवार : एप्रिलपासून राज्यभर अंमलबजावणी

कोल्हापूर : सोने-चांदी तसेच मौल्यवान धातू व खडे यांच्या मोजमापातील अचूकपणासाठी व ग्राहकांना त्यांनी दिलेल्या मोबदल्यात योग्य वजनामध्ये मौल्यवान धातू मिळावेत, यासाठी एक एप्रिलपासून सर्व सोने-चांदी तसेच मौल्यवान धातू व खड्यांच्या मोजमापासाठी एक मिलीग्रॅम अचूकतेचे इलेक्ट्रॉनिक काटे वापरणे बंधनकारक केल्याची माहिती सहाय्यक नियंत्रक, वैध मापनशास्त्र द. प्र. पवार यांनी दिली.कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहक संरक्षण परिषदेच्या दिनांक ९ मार्च २०१५च्या बैठकीत सोने-चांदी व मौल्यवान धातू तसेच खडे यांच्या व्यवहारात ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे काही अशासकीय सदस्यांनी निदर्शनास आणून दिले होते. ग्राहकांना त्यांनी खरेदी केलेल्या या किमती वस्तू वजनामध्ये योग्य आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी धर्मकाटे बसवावेत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली होती. परंतु, वैधमापन शास्त्र कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही तसेच शासनाद्वारे धर्मकाटा बसवण्याबाबत कोणतीही योजना नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्र वैधमापन शास्त्र (अंमलबजावणी) नियमातील ‘नियम ४’ मध्ये सोने-चांदी तसेच मौल्यवान वस्तू व खडे यांच्या मोजमापासाठी केवळ ‘वर्ग अ’ व ‘वर्ग ब’प्रवर्गाच्या दांडीचा तराजू बुलियन वजने तसेच विशेष अचूकता (वर्ग १) व उच्च अचूकता असलेली (वर्ग २) ची अस्वयंचलित उपकरणे वापरण्याची तरतूद आहे. परंतु, या मोजमापामध्ये अधिक अचूकता यावी याकरिता नियंत्रक वैधमापन शास्त्र यांना असलेल्या विशेष अधिकारानुसार नियंत्रक, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी एक मिलीग्रॅम अचूकतेची फक्त इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणे वापरणे बंधनकारक असल्याचे आदेश काढलेले आहेत. मौल्यवान धातू व खडे यांच्या मोजमापात अचूकता आल्याने ग्राहकांची फसवणूक नाही यासंदर्भात ग्राहकांच्या काही तक्रारी व शंका असल्यास सहायक नियंत्रक, वैधमापन शास्त्र, यांच्याशी संपर्क साधावा