शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

चिकोत्रा नदीवरील उपसाबंदी नावापुरतीच, विद्युत पुरवठा खंडित : विद्युततारांना आकडे टाकून पाणी उपसा;ग्रामपंचायतीची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:38 IST

सेनापती कापशी : गेली तीन-चार वर्षे सातत्याने पाणीटंचाईलासामोरे जाणाºया चिकोत्रा खोऱ्याला यंदाही मोठ्या दुष्काळाशी सामना करावा लागत आहे.

शशिकांत भोसले।सेनापती कापशी : गेली तीन-चार वर्षे सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या चिकोत्रा खोऱ्याला यंदाही मोठ्या दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. चिकोत्रा धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर महावितरणपाटबंधारे विभागाकडून उपसाबंदी लागू केली जाते; पण हा उपसाबंदीचा आदेश झुगारून स्वत:ला बागायत शेतकरी समजणारे काहीजण राजरोसपणे विद्युततारांना आकडे टाकून पाणी उपसा करत आहेत. परिणामी सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होऊन ग्रामस्थांना पाणीपुरवठा करताना ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे.चिकोत्रा खोऱ्यातील ५२ गावांचा पाणीप्रश्न मोठा गंभीर बनत चालला असून, चिकोत्रा प्रकल्पात होणाराकमी पाणीसाठा हे त्याचे प्रमुखकारण आहे.

प्रकल्प पूर्ण झाल्यापासून फक्त दोनचवेळा पूर्ण क्षमतेने भरला आहे.चिकोत्रा प्रकल्प परिसरात असणारे पावसाचे अल्प प्रमाण व धरण क्षेत्रात येणाºया पाण्याचे कमी स्रोत यामुळे हा प्रकल्प जास्तीत जास्त ६५ ते ७० टक्केच भरतो. पावसाळ्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याकरिता योग्य ते नियोजन करण्याचीगरज आहे; पण राजकीय पातळीवरून अथवा प्रशासनाकडून तशीभरीव हालचाल होत नसल्यामुळे चिकोत्रा खोऱ्यातील जनतेला सातत्याने मोठ्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.1 प्रकल्पात असणारा अत्यल्प पाणीसाठा व पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेले भरमसाट पाणी परवाने यामुळे या खोºयाचा पाणीप्रश्न येथूनपुढे भीषण होणार आहे.2 काही शेतकरी तर अनधिकृतपणे थेट पाणी उपसा करत आहेत. ज्यावेळी कारवाई करायची वेळ येते, त्यावेळी पाटबंधारे व महावितरणचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवितात. यामुळेच अशा शेतकºयांचे फावत आहे.3 पाटबंधारे व महावितरणच्या अधिकाºयांनी समन्वयाने योग्य नियोजन केले तर सुरळीत पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतींना शक्य आहे, अन्यथा चिकोत्रा नदीकाठावरील ५२ गावांचा पाणीप्रश्न मोठा गंभीर होणार आहे.महावितरणकडून दुर्लक्ष : बेसुमार पाणी उपसाचिकोत्रा प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर जास्तीत जास्त सात ते आठ दिवसांत नदीपात्र कोरडे पडते. यावरून पाणी किती मोठ्या प्रमाणात उपसा होते याची कल्पना येते. काही हुशार बागायत शेतकरी तर पाणी नदीपात्रात आलेले पाहताच उपसाबंदी झुगारून राजरोसपणे दिवसाढवळ्या आकडे टाकून बेसुमार पाणी उपसा करत आहेत. अशा काही शेतकºयांना पाटबंधारे व महावितरणच्या संबंधितांकडून कायम अभय मिळत असल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.आता थेट अशा अधिकाºयांवर मोर्चा काढून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करणार आहेत. आजपर्यंत बेकायदा पाणी उपसा करणारे अनेक मोटारपंप ग्रामस्थांनी दाखवून दिले; पण कोणतीही कारवाई न करता सोडल्यामुळे असे शेतकरी राजरोसपणे आकडे टाकून पाणी उपसा करत आहेत.