शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांना रात्री कमी दरात वीज

By admin | Updated: January 20, 2016 01:14 IST

मुंबईतील बैठक : ऊर्जामंत्र्यांचे उद्योजकांना आश्वासन

सतीश पाटील -- शिरोली‘मेक इन इंडिया’अंतर्गत ‘मेक इन महाराष्ट्र’ ही संकल्पना साकारण्यासाठी शासन महत्त्वाची पावले उचलत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जास्तीत जास्त उद्योगांना चालना देण्यासाठी रात्रीच्या वेळेला कमी दरात वीजपुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी राज्यातील उद्योजकांना दिली. उद्योग क्षेत्रात विजेचे दर कमी करण्याबाबत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर तसेच राज्यातील उद्योजक आणि उद्योग संस्थांचे प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीत उद्योजकांनी पोटतिडकीने आपली मते मांडली. अहमदनगरचे उद्योजक म्हणाले, सरकार विदर्भ-मराठवाड्याला कमी दराने वीज देणार आहे, मग आम्ही काय घोडे मारले आहे. एकाच राज्यात दोन वेगवेगळे दर, असे झाले तर पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत तुम्हाला याचा निश्चितच परिणाम दिसेल. पुण्यातील उद्योजकांनी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचे दर जास्त आहेत त्यामुळे येथील आॅटोमोबाईल उद्योग स्थलांतरित केला आहे, यावर वेळीच विचार करावा, असे सांगितले. कर्नाटक सरकार कोल्हापूरच्या उद्योजकांना सवलतीच्या दरात वीज, पाणी, जमीन देण्यास तयार आहे. त्यामुळे येथील उद्योजक कर्नाटकमध्ये जाण्याचा विचार करत आहेत. तरी शासनाने वीज दराबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी कोल्हापूरसह आठ उद्योजकांनी केली. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्योजकांनी रात्रीच्या वेळी विजेचा वापर करावा, युनिटमागे दीड रुपया स्वस्त वीज मिळेल. आठ तासाऐवजी बारा तासांची पाळी केली जाईल, त्याचा फायदा उद्योजकांनी घ्यावा. महावितरण कंपनीचे सर्व इन्सेन्टिव्ह वापरा, आपल्याला वीज बिलात वीस टक्के सवलत मिळेल. २०१२-२०१३ सालचा अतिरिक्त सेवा शुल्क एप्रिल महिन्यापासून बंद केला जाईल. त्यामुळे नव्वद पैसे प्रतियुनिट वीज दर कमी होतील. याचा उद्योजकांना फायदा होईल. बावनकुळे म्हणाले की, राज्यात सद्य:स्थितीत ऐंशी टक्के वीजनिर्मिती कोळशापासून केली जाते. उद्योगक्षेत्रातील विजेचे दर कमी करण्यासाठी वीज उत्पादनाचे आणि कोळशाचे दर कमी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोळशा वाहतुकीचे दर कमी करण्याचीही गरज आहे. त्यासाठी रात्रीचे बारा तास वीज कमी दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. बावनकुळे म्हणाले...उद्योजकांनी रात्रीच्या वेळी विजेचा वापर करावा, युनिटमागे दीड रुपया स्वस्त वीज मिळेल, आठ तासांऐवजी बारा तासांची पाळी केली जाईल.महावितरण कंपनीचे सर्व इन्सेन्टिव्ह वापरा. आपल्याला वीज बिलात वीस टक्के सवलत मिळेल. २०१२-१३ सालचा अतिरिक्त सेवा शुल्क एप्रिल महिन्यापासून बंद केला जाईल. त्यामुळे नव्वद पैसे प्रतियुनिट वीज दर कमी होतील. याचाही उद्योजकांना फायदा होईल.