ग्राहकांनी आपल्या वीजमीटरचे रिडिंग स्वत:हून ‘महावितरण’ला पाठवावे. गेल्यावर्षीच्या मे महिन्यात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील २५,३४९ वीजग्राहकांनी ‘महावितरण’च्या आवाहनास प्रतिसाद देत ‘सेल्फ मीटर रिडिंग’ नोंदविले होते. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील १२,२४९ ग्राहकांनी ग्रो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडला आहे. ‘महावितरण’कडून वीज ग्राहकांना छापील कागदी बिलांऐवजी ई-मेलवर वीज बिल स्वीकारण्याची गो-ग्रीन ही एक ऐच्छिक सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेसाठी नोंदणी करणाऱ्या वीज ग्राहकांना दरमहा वीज बिलात दहा रुपयांची सवलत दिली जात असल्याची माहिती निर्मळे यांनी दिली.
चौकट
सुमारे ३ लाख ग्राहक भरतात ऑनलाईन बिल
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील १६,६८,१०९ अकृषीक वीज ग्राहकांपैकी १५,९४०५२ ग्राहकांनी (९५.५६ टक्के) मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे.
साधारणपणे ३ लाख ८० हजार ग्राहक (२३.४६ टक्के) दरमहा वीज बील ऑनलाईनव्दारे भरतात.