शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

वीज अंगावर कोसळून युवतीचा मृत्यू

By admin | Updated: May 28, 2014 00:55 IST

कुटुंबाचा आधार हरपला : करंजिवणे येथे शेतात भात टोकणताना दुर्घटना

मुरगूड : कागल तालुक्यातील करंजिवणे गावातील महाविद्यालयीन युवती वर्षा आनंदा पोवार (वय १९) हिचा शेतामध्ये भात टोकणताना वीज अंगावर कोसळून जागीच मृत्यू झाला. एक वर्षापूर्वी पितृछत्र हरवलेल्या आई व लहान भावाला आधार देण्यासाठी कोल्हापूर येथील एमआयडीसीमध्ये नोकरी करणार्‍या वर्षाला आज सुटीच्या दिवशीच नियतीने हेरले. तिच्या आकस्मिक मृत्यूने पोवार कुटुंबाचा आधारच हरपला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, गरिबीच्या परिस्थितीतही मुरगूड विद्यालयामध्ये आठवी ते बारावीपर्यंत जिद्दीने ती शिकली. त्यानंतर तेथीलच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तिने २०१२-१३ मध्ये शिवणकामाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. दीड वर्षापूर्वी तिच्या वडिलांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने घरची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन वर्षाने एमआयडीसीमध्ये गारमेंट कंपनीत नोकरी सुरू केली होती. यातून घर व्यवस्थित चालत होते. ती कधीच शेतात जात नव्हती; पण आज, मंगळवारी सुटी असल्याने आई श्रीमती सुमन, गावातील अनंत कांबळे यांच्यासह गावातील पाझर तलावाजवळ असणार्‍या भटकी नावाच्या शेतात भात टोकणीसाठी गेली होती. वर्षा दुपारी घरी येऊन आई व इतरांसाठी चहा घेऊन परत शेतावर गेली. चहा पिण्यासाठी सर्वजण शेतातील झाडाखाली थांबले. इतक्यात वळीव पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास पाऊस सुरू होता. चहा घेतल्यानंतर पाऊस कमी झाला म्हणून आई आणि अनंत कांबळे भात टोकणी करण्यासाठी झाडापासून दूर गेले. अचानक झाडाखाली बसलेल्या वर्षाच्या अंगावर वीज कोसळली. वर्षाची आई आणि अनंत कांबळे यांनी मागे वळून पाहिले तर वर्षाच्या अंगावरील कपडे, डोक्याचे केस पेटत होते. त्यांनी तत्काळ जवळ जाऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला; पण तिचा जागीच मृत्यू झाला होता. ग्रामस्थांनी मृतदेह गावात आणल्यानंतर आई व लहान भाऊ विश्वनाथ यांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद मुरगूड पोलीस ठाण्यामध्ये झाली. सायंकाळी मुरगूड ग्रामीण रुग्णालयामध्ये वर्षाच्या मृतदेहाचे विच्छेदन करून तो कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. रात्री करंजिवणे गावात शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)