शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

नगरपालिकांच्या विषय समित्यांची १९ ला निवडणूक

By admin | Updated: December 15, 2015 00:33 IST

विधान परिषद निवडणुकीमुळे सहलीवर गेलेल्या नगरसेवकांची गोची

इचलकरंजी : जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांकडील विविध विषय समित्यांची व सभापतिपदाची निवडणूक १९ डिसेंबरला होणार आहे. सध्या होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समित्यांच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.जिल्ह्यातील एकूण नऊ नगरपालिकांपैकी इचलकरंजीची सर्वांत मोठी नगरपालिका आहे. येथे कॉँग्रेस व राष्ट्रवादी अशी आघाडी सत्तेवर असली तरी कॉँग्रेसच्या नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे राजीनामा देण्यास नकार देऊन जानेवारी महिन्यात बंड केले आहे. त्यांच्या या बंडाला विरोधी शहर विकास आघाडी व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिल्याने इचलकरंजी नगरपालिकेतील राजकीय संदर्भ बदलले आहेत.विधान परिषद निवडणुकीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांच्यात सरळ लढत असल्याने या निवडणुकीत रंगत चढली आहे. अशा पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांकडील विषय समित्यांची निवडणूक १९ डिसेंबरला घेण्याची विषयपत्रिका सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी जारी केली.विधान परिषद निवडणुकीचे मतदान २७ डिसेंबरला होणार आहे. तत्पूर्वी पालिकांच्या विषय समित्यांची निवडणूक होणार असल्यामुळे सहलीवर गेलेल्या नगरसेवकांना १९ डिसेंबरच्या समिती निवडणुकीच्या सभेला उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामुळे नगरसेवकांना सहलीवर पाठविण्याची अडचण नेत्यांसमोर निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)इचलकरंजीत सात ‘चळवळ्यांना’ दूर ठेवणारइचलकरंजी नगरपालिकेत कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ११ व शहर विकास आघाडीचे १७ असे पक्षनिहाय बलाबल आहे. बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छता, शिक्षण आणि महिला व बालकल्याण अशा पाच समित्या १९ डिसेंबरला निवडल्या जातील. या समित्यांवर कोठा पद्धतीने एकूण १९ पैकी कॉँग्रेसचे दहा, राष्ट्रवादीचे तीन व ‘शविआ’चे सहा असे नगरसेवक त्या-त्या पक्षाच्या पक्षप्रतोदांकडून निवडण्यात येतील आणि एका नगरसेवकाला कमाल तीन समित्यांमध्ये सहभागी होता येते. कॉँग्रेसमधील सहा नगरसेवकांना व राष्ट्रवादीतील एका नगरसेवकाला ते ‘चळवळी’ असल्याने समित्यांपासून दूर ठेवले जाईल, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात आहे. चळवळी नगरसेवकांत नगराध्यक्षा बिरंजे, संजय तेलनाडे, चंद्रकांत शेळके, रेखा रजपुते, मीना बेडगे, सुनीता मोरबाळे आणि विठ्ठल चोपडे यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. अन्यथा त्यांना शिक्षण आणि महिला व बालकल्याण समितीत घातले जाईल.