शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कोल्हापुरात...अर्ज गगनबावड्यात

By admin | Updated: March 17, 2015 00:06 IST

सत्यशोधक बँकेची स्थिती : सहकार खात्याच्या कारभाराचा एक नमुना

कोल्हापूर : येथील अ‍ॅड. शामराव शिंदे सत्यशोधक सहकारी बँकेचे मुख्यालय कोल्हापुरात आहे; परंतु या बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायला चक्क गगनबावड्याला जावे लागत आहे. कारण बँकेचे निवडणूक अधिकारी टी. डी. बल्लाळ असून, ते गगनबावड्याचे सहायक उपनिबंधक आहेत.सोमवारी पहिल्याच दिवशी या बँकेसाठी एकमेव अर्ज दाखल झाला आहे. शुक्रवार (दि.२०)पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या १४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. जिल्हा कार्यालय असलेल्या या बँकेचे सुमारे सात हजार सभासद आहेत. निवडणूक १९ एप्रिलला व मतमोजणी २० एप्रिलला आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता जास्त आहे.या बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सहकार खात्याच्या कारभारावर प्रकाशझोत पडला आहे. आजपर्यंत सहकार खाते निवडणुकीत कसेही ‘मॅनेज’ करता येते, असे लोक उघडपणे बोलून दाखवत. आता राज्य शासनाने सहकार संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी कायद्याने स्वतंत्र निवडणूक प्राधिकरण स्थापन केले; परंतु त्यांच्याकडे स्वतंत्र मनुष्यबळ नसल्याने सहकार खात्याचीच यंत्रणा वापरून निवडणुकीचे काम पार पाडले जात आहे. त्यामुळेच बँक कोल्हापुरात व निवडणूक कार्यालय गगनबावड्यात, असे हास्यास्पद चित्र तयार झाले आहे. बल्लाळ यांच्याकडे सहायक निबंधकाची जबाबदारी आहे. स्थानिक तालुक्यातील कामे असल्याने त्यांना या बँकेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र वेळ द्यायला अडचणी आहेत. त्यामुळे ते त्यांच्याकडे मूळ जबाबदारी आहेत त्याच कार्यालयात बसत असल्याने एखाद्याला या बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा झाल्यास गगनबावडा गाठायला लागत आहे. सहकार खात्याच्या हा गंमतीशीर प्रकाराची सभासदांतही चेष्टा होऊ लागली आहे. काहींच्यामते विरोधातील लोकांनी अर्जच दाखल करू नये, यासाठीही काही संस्था असे आपल्याला सोयीचे निवडणूक अधिकारी पुण्यात सहकार प्राधिकरणाच्या कार्यालयात बसून त्यांची आॅर्डर करून आणत आहेत. मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या संस्था आपल्या काखेतील अधिकाऱ्यांना व जिथे काहीच पदरात पडणार नाही, अशा संस्था ठरावीक अधिकाऱ्यांना देण्याचे ‘राजकारण’ही जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सुरू आहे. (प्रतिनिधी)मूळ जबाबदारीच्या कामाचा ताणबॅँकेचे निवडणूक अधिकारी टी. डी. बल्लाळ असून, ते गगनबावड्याचे सहायक उपनिबंधक आहेत.स्थानिक तालुक्यातील कामे असल्याने त्यांना या बँकेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र वेळ द्यायला अडचणी आहेत. यामुळे ते त्यांच्याकडे मूळ जबाबदारी आहे, त्याच कार्यालयात बसत असल्याने एखाद्याला या बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा झाल्यास गगनबावडा गाठायला लागत आहे.