शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तीन कारखान्यांच्या निवडणुकीचा बिगुल

By admin | Updated: February 9, 2015 00:37 IST

जिल्ह्याचा पश्चिम भाग : साखर सह. संचालक कार्यालयात संभाव्य निवडणुकीच्या आराखड्यावर आज चर्चा

प्रकाश पाटील - कोपार्डे -राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या कुंभी-कासारी (कुडित्रे), दूधगंगा-वेदगंगा (बिद्री) व भोगावती (परिते) या साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. संभाव्य निवडणूक आराखड्यासाठी प्रादेशिक सहसंचालक कोल्हापूर येथे कारखाना प्रशासनाबरोबर नियोजनात्मक दृष्टीने चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलाविली आहे. येत्या मे ते जून महिन्यापर्यंत जिल्ह्याच्या पश्चिम भागातील राजकीय वातावरण पुन्हा तापणार आहे.जिल्ह्यातील कुंभी-कुडित्रे, दूधगंगा-वेदगंगा (परिते), भोगावती (परिते) या साखर कारखान्यांमध्ये आजी-माजी आमदारांच्या सत्ता आहेत. विधानसभेला ‘कुंभी’चे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांना यश मिळविताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली, तर ‘बिद्री’चे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. या तिन्ही साखर कारखान्यांमध्ये राजकीय सांगड असून, राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील म्हणून या तिन्ही साखर कारखान्यांच्या निवडणुकीकडे पाहिले जाते.कुंभी-कासारी कारखान्यावर दहा वर्षांपासून नरके यांची निर्विवाद सत्ता आहे, तर त्यांनी ‘भोगावती’त राष्ट्रवादी व शेतकरी कामगार पक्षाला बरोबर घेऊन आपले विधानसभेचे विरोधक पी. एन. पाटील यांना सत्तेतून पायउतार करताना दोनवेळा आमदारकीही काबीज केली आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते राजकीय ईर्ष्येने पेटून उठले आहेत. त्यादृष्टीने कुंभी-कासारी व भोगावतीमध्ये राजकीय समीकरणे व ध्रुवीकरण करण्यास पी. एन. पाटील गट सक्रिय झाला आहे. याचाच एक भाग म्हणून आमदार प्रकाश आबिटकर यांना सहकारी म्हणून घेण्यास काँग्रेस कार्यकर्ते उत्सुक आहेत.‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांनी पी. एन. पाटील यांचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी चंद्रदीप नरके यांना मदत केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राधानगरीमध्ये के. पीं.च्या विरोधात भूमिका घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांना बळ देत विजयी केले. आता बिद्रीच्या राजकारणातही के. पीं. विरोधात आबिटकर अशी ताकद उभा करून पी. एन. पाटील यांच्या विरोधात विधानसभेला केलेल्या विरोधी खेळीचा वचपा काढण्याचाही काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे.तिन्ही कारखान्यांची राजकीय सांगड असल्यामुळे येत्या काळात कारखान्यांच्या निवडणुकीतून करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, कागल या सहा तालुक्यांतील राजकीय वातावरण तापणार आहे.