शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

‘कुंभी-कासारी’च्या निवडणुकीला मुहूर्त मिळेना

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

विरोधक आक्रमक : तांत्रिक त्रुटी नसताना निवडणूक प्रक्रिया संथगतीने चालल्याचा आरोप

प्रकाश पाटील - कोपार्डे -कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत जानेवारी २०१५ मध्ये संपली आहे; मात्र संस्था प्रतिनिधीच्या मुद्द्यावरून कारखाना प्रशासन न्यायालयात गेल्याने व एक-दोन वर्षांपूर्वी मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रथम घेण्यास प्राधान्य दिले गेल्याने कुंभीच्या निवडणुकीबाबत साशंकता होती. मात्र, हे सर्व अडथळे बाजूला होऊन कच्ची, पक्की मतदार यादी प्रसिद्ध होऊन २० ते २५ दिवस उलटून गेले असले, तरी कार्यक्रम जाहीर न झाल्याने कुंभीच्या निवडणुकीला मुहूर्त कधी, अशी चर्चा सुरू आहे.कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१५ ते २०२० या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया रीतसर सुरू झाली. यातून कच्ची मतदार यादी जाहीर करून १९ जून २०१५ ला पक्की मतदार यादीही तयार करण्यात आली. साखर सहसंचालक कार्यालयाकडून निवडणूक अधिकारी नेमणे व कार्यक्रम जाहीर करण्यासाठी साखर आयुक्तालय व सहकार प्राधिकरणाला कळविण्यात आले. वास्तविक पक्की मतदार यादी जाहीर केल्यानंतर पुढील दहा दिवसांत निवडणूक अधिकारी नेमून कार्यक्रम जाहीर करणे क्रमप्राप्त होते. मात्र, पक्की मतदार यादी जाहीर होऊन २० ते २५ दिवस झाले असले, तरी निवडणूक अधिकारी नेमल्यानंतर निवडणूक कार्यक्रम बनवून तो प्रसिद्ध झाला नसल्याने निवडणूक लांबणीवर पडली आहे का? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. विरोधक मात्र ‘कुंभी-कासारी’च्या निवडणुकीबाबत वारंवार प्रशासनाचे दरवाजे ठोठावताना दिसतात. यावेळी प्रशासन जागे होते व जुजबी हालचाली सुरू होतात, असे चित्र पाहायला मिळते. मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीही अशाच घडामोडी घडल्या होत्या. कुंभी बचाव मंचने साखर सहसंचालक, सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार धावा बोलल्यानंतरच कच्ची व पक्की मतदार यादी प्रसिद्ध झाली. मात्र, यादरम्यान सत्ताधारी गटाचे मौन, तर शेतकरी संघटनेने पावसाळा, पंढरपूर आषाढी वारी यांचे कारण पुढे करून निवडणूक पावसाळ्यानंतर घेण्याचे निवेदन दिले; पण बचाव मंचने निवडणूक वेळेतच झाली पाहिजे यासाठी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर कच्ची-पक्की मतदार यादी प्रसिद्ध झाली. मात्र, यानंतर दहा दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आॅगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात ही निवडणूक होईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी विद्युत वरखडे यांची नेमणूक झाली असली तरी त्यांना अन्य कामेही असल्याने कार्यक्रम जाहीर झाला नसल्याने ‘कुंभी’च्या निवडणुकीला मुहूर्त कधी? अशी चर्चा कार्यक्षेत्रात जोरात आहे.