शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंचे आझाद मैदानात आंदोलन सुरु, हजारो मराठा आंदोलक मुंबईत
2
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
3
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
4
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
5
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
6
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
7
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
8
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
9
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
10
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
11
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
12
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
13
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
14
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
15
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
16
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
17
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
18
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
19
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात

‘करवीर नगर वाचन मंदिर’ची निवडणूक जाहीर

By admin | Updated: May 7, 2016 00:57 IST

इच्छुकांची तयारी सुरू : मंगळवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया; ५ जूनला मतदान

कोल्हापूर : स्थापनेची १६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या आणि कोल्हापुराच्या वाचनसंस्कृतीचा मानदंड असलेल्या करवीर नगर वाचन मंदिरा (कनवा)ची निवडणूक जाहीर झाली आहे. ‘कनवा’च्या सन २०१६-२०२१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवार (दि. १०) ते गुरुवार (दि. १२) पर्यंत आहे. या निवडणुकीत सुमारे २२०० सभासद मतदानासाठी पात्र आहेत. काही इच्छुक सभासदांकडून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू झाली आहे.संपूर्ण संगणकीकृत, १ लाख ३ हजार पुस्तके, राज्य शासनाचा ‘अ’ वर्गाचा दर्जा, दुर्मीळ ग्रंथ व हस्तलिखितांचे डिजिटायझेशन, अंधांसाठी ब्रेल लिपीतील साहित्य आणि मोफत अभ्यासिका, आदी स्वरूपांतील ‘कनवा’ची वैशिष्ट्ये आहेत. या संस्थेचे सध्या एकूण ४००० सभासद आहेत. यांतील ७५० आजीव, तर ३२५० हे सामान्य सभासद आहेत. यांतील २२०० सभासद हे मतदानासाठी पात्र आहेत. संस्थेची १५ जणांची कार्यकारिणी आहे. या सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, अंतर्गत हिशेब तपासनीस, कार्याध्यक्ष, उपकार्याध्यक्ष, कार्यवाह, सहकार्यवाह व अन्य आठ संचालक यांचा समावेश आहे. त्यासह आजीव सभासद, महिला सभासद, साहित्यिक यांच्यातील प्रत्येकी एका प्रतिनिधीचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. अभिजित देसाई हे काम पाहत आहेत. दरम्यान, या निवडणुकीसाठी काही सभासदांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मतदार यादी मिळविण्यासह उमेदवार निवडण्यासाठी त्यांची चाचपणी सुरू आहे. त्याचप्रमाणे विद्यमान संचालकांकडूनही निवडणुकीची तयारी सुरू आहे. या संस्थेची आतापर्यंत अधिकतर वेळा निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र, यावेळी निवडणूक लागण्याची शक्यता काही सभासदांकडून व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास २५ वर्षांनंतर या संस्थेची निवडणूक रंगणार आहे. (प्रतिनिधी) मतदार पात्रतेसाठी हे आवश्यकज्या सभासदांकडे पुस्तकांची बाकी नाही, तीन वर्षांत सातत्याने सभासद आहेत; शिवाय दि. ३० एप्रिल पूर्ण वर्गणी भरलेली आहे, असे सभासद निवडणुकीत मतदानासाठी पात्र ठरणार आहेत.वादाचे पडसाद निवडणुकीतकरवीर नगर वाचन मंदिराचे शाहूकालीन शिवाजी सभागृह पाडल्याचा राग तसेच अंबाबाई मंदिरातील गाभारा प्रवेशानंतरचे राजकारण या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. या संस्थेत आता मराठा समाजाचेही पॅनेल उभे करण्याची तयारी सुरु असून निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता यामुळे मावळलेली आहे. विद्यमान पदाधिकारीराजाभाऊ जोशी (अध्यक्ष), विकास परांजपे (अंतर्गत हिशेब तपासनीस), अनिल वेल्हाळ (कार्याध्यक्ष), श्रीकृष्ण साळोखे (उपकार्याध्यक्ष), अभिजित भोसले (कार्यवाह), उदय सांगवडेकर (सहकार्यवाह).