शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मी पाहिलेली निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:27 IST

स्व. बाळासाहेब माने १९७० मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते खासदार झाले. या कालावधीनंतरच्या प्रत्येक निवडणुकीच्या ...

स्व. बाळासाहेब माने १९७० मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते खासदार झाले. या कालावधीनंतरच्या प्रत्येक निवडणुकीच्या काळात सध्यासारखे तणावाचे किंवा गटा-तटाचे राजकारण म्हणावे तसे नव्हते. एकमेकांची उणीदुणी काढण्याचे प्रमाण अत्यल्प होते. स्वत:च्या मतदारसंघात लोकोपयोगी कामे केल्याने खालील स्तरावरील मतदार खूश असायचे. मतदारांच्या समाधानाच्या भांडवलामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्येही ते यशस्वी झाले. त्यांच्या मतदारसंघातील कोणताही सुशिक्षित किंवा अशिक्षित मतदार एखादे काम घेऊन त्यांच्याकडे गेला व भेटायला आलेल्या मतदारावर खरोखरच अन्याय झाल्याची स्व. बाळासाहेब माने यांची खात्री झाली की ते टेबलावरील लँडलाईनवर (त्यावेळी मोबाईल नव्हते) शासकीय खात्यातील संबंधित ‘साहेबा’स ते कडक शब्दांत आदेश देत असत व खरोखरच काम ताबडतोब होत असे. अशा प्रकारचे काम घेऊन गेलेल्या अनेक नागरिकांची कामे तत्काळ झाल्याने संबंधित व्यक्ती व त्यांच्या घरातील मतदार माने यांच्या प्रचारासाठी पुढाकार घ्यायचे. गरजू मतदारांची कामे करणे या एकाच भांडवलावर त्यांनी पुढील निवडणुकीतही यश संपादन केले होते. निवडणूकपूर्व प्रचारात त्यावेळी सर्व स्तरांवरील मतदार मतदारसंघातील खेडी वाटून घेऊन स्वत:च्या घरातील भाकरी व खर्डा/चटणी बांधून घेऊन सकाळपासून सायंकाळपर्यंत बाहेरच असायचे. प्रचारावेळी जेवणाची वेळ झाली की, एखादी बाग किंवा निवाऱ्याची जागा दिसल्यास त्याठिकाणी सर्वजण जमिनीवर एकत्र बसून वनभोजन करत असत व अत्यल्प विश्रांतीनंतर पुन्हा हिरीरीने प्रचाराच्या रणधुमाळीत रममाण होत असायचे. आतासारखी त्यावेळी मोटारसायकली किंवा चारचाकी वाहने बोटावर मोजण्यासारखीच असत. सध्या मोटारसायकलींमध्ये पेट्रोल घालण्यासाठीचे व हॉटेल किंवा ढाब्यांमध्ये जेवणासाठीचे शिक्के मारलेले पासेस देण्याच्या पद्धतीची गरजही नसायची. काहीही खर्च न करता मतदारसंघातील प्रत्येक मतदाराच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे पुढारी भविष्यात पुढे येतील याची आपण सर्वांनी वाट पाहूया.- ए. जी. पलसे, जयसिंगपूर