लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी)च्या ४० जागांसाठी ९ आॅगस्टला निवडणूक होत आहे. याबाबतचा कार्यक्रम शनिवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी जाहीर केला. मंगळवार (दि. १८)पासून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत निवडणूक अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्या दालनात उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.जिल्हा नियोजन समितीच्या ४० जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये ग्रामीण निर्वाचन (जिल्हा परिषद) क्षेत्राच्या २९ जागा, मोठ्या निर्वाचन (महापालिका) क्षेत्राच्या सहा व लहान नागरी निर्वाचन (नगरपालिका) क्षेत्राच्या पाच जागांचा समावेश आहे. यामधील ५० टक्के जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार ग्रामीण निर्वाचन (जिल्हा परिषद) क्षेत्रासाठी १५ जागा, मोठ्या निर्वाचन (महापालिका) क्षेत्रासाठी पाच जागा व लहान नागरी निर्वाचन (नगरपालिका) क्षेत्रासाठी तीन जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत.या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी सुभेदार यांनी शनिवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार मंगळवारी (दि. १८) ते २१ जुलैपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. २४ जुलैला सकाळी ११ वाजल्यापासून प्राप्त अर्जांची छाननी होणार आहे. २५ जुलैला वैध अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज फेटाळल्यास २७ जुलैला सायंकाळी ५.४५ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता येणार आहे. २९ जुलैला आलेल्या अपिलांवर अंतिम निर्णय होणार आहे. ३१ जुलैला वैध अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अर्जमाघार १ आॅगस्टला सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत होणार आहे. यानंतर २ जुलैला निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ९ आॅगस्टला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. ११ आॅगस्टला सकाळी ११ पासून रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणी होणार आहे.+निवडणूक अधिकाऱ्यांचे पथकनिवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी व सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांची, तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अशोक पाटील, राधानगरीच्या प्रांताधिकारी मनीषा कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगवणे यांच्याकडे नगरपालिका क्षेत्र, अशोक पाटील यांच्याकडे महापालिका व मनीषा कुंभार यांच्याकडे जि. प. क्षेत्र असेल.निवडणुकीसाठी ३६७ मतदार
जिल्हा नियोजन समितीची निवडणूक ९ आॅगस्टला
By admin | Updated: July 16, 2017 00:55 IST