शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांचे जन्मगाव खानापूरची निवडणूक लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST

शिवाजी सावंत गारगोटी : भुदरगड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, तालुक्यासह जिल्ह्यात लक्षवेधी ...

शिवाजी सावंत

गारगोटी : भुदरगड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, तालुक्यासह जिल्ह्यात लक्षवेधी निवडणूक खानापूर गावची होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे हे जन्मगाव आहे. त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. भाजपप्रणित स्थानिक आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या गटाचा समावेश आहे; तर आमदार प्रकाश आबिटकर गट विरोधात तयारी करीत आहे. आमदार पाटील यांच्यावर ‘गावची निवडणूक जिंकून दाखवा,’ अशी सातत्याने विरोधकांतून टीका होत असते; त्यामुळे या निवडणुकीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. आमदार पाटील यांचेही गावाकडील निवडणुकीकडे सातत्याने लक्ष असून ते प्रत्येक दिवसाचा आढावा घेत आहेत. विशेष म्हणजे भाजपबरोबर राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्तेही आघाडीत सामील झाले आहेत.

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे नेतृत्व भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रवीणसिंह सावंत, काँग्रेसचे भुजंगराव मगदूम, सुनील मांगले, संदीप पाटील, संजय रेडेकर करीत आहेत; तर आमदार प्रकाश आबिटकर गटाचे नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बी. डी. भोपळे, राजू पाटील, मानसिंग दबडे, अशोक वारके करीत आहेत.

विशेष म्हणजे राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी आघाडी झाली असली तरी खानापूर ग्रामपंचायतीत थोडासा विरोधाभास असणारी आघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांचीच सत्ता होती, यावेळी आमदार प्रकाश आबिटकर गटाने सत्ता खेचून घेण्यासाठी कंबर कसली असून, आमदार पाटील विरुद्ध आमदार आबिटकर असे रणांगण तापणार आहे. दिवसेंदिवस वातावरण तप्त असून संमिश्र प्रतिसाद मिळण्याचे संकेत आहेत.