संस्थेचे चेअरमन कैलास सुतार यांनी राजीनामा दिल्याने रिकाम्या जागी त्यांची निवड करण्यात आली. बाळ डेळेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.
स्वागत व प्रास्ताविक शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी केले.
यावेळी व्हा. चेअरमन सुभाष पाटील, संचालक आनंदराव काटकर, कृष्णात पाटील, कृष्णात खाडे, गंगाराम हजारे, संजय डवर, शांताराम तौंदकर, राजेंद्र रानमाळे, अनिल चव्हाण, कैलास सुतार, सुलोचना कोळी, जर्नादन गुरव यांच्यासह उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे, प्रशासन अधिकारी उत्तम कवडे व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.