शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध, रुग्णांना भेटला ‘श्रावणबाळ’

By admin | Updated: September 1, 2014 00:28 IST

दीपकची मोफत सेवा; आतापर्यंत जवळपास ३०० हून अधिक व्यक्तींना मदत

प्रदीप शिंदे - कोल्हापूर --आयुष्यभर कष्ट करून, मुलांच्या शिक्षणासाठी रात्रीचे दिवस केले, त्या आई-वडिलांना आयुष्याच्या शेवटी एकटे राहावे लागते. अनेक मुलांना नोकरी-व्यवसायानिमित्त गाव सोडून बाहेर राहावे लागते. इच्छा असूनही आजारी आई-वडिलांची सेवा करण्यासाठी येता येत नाही, तर काही मुलांना वृद्ध आई-वडीलच नको असतात. अशा वृद्ध व्यक्तींसाठी कोल्हापुरातील दीपक कदमच्या रूपाने आधुनिक काळातील श्रावणबाळच भेटला आहे.शहरातील अशा वृद्ध व अंथरुणाला खिळलेल्या रुग्ण व्यक्तींच्या घरी दीपक दररोज सकाळी व सायंकाळी जाऊन त्यांची मोफत सेवा करतो. वृद्ध व्यक्तींना औषधे देणे, कधी तब्येत बिघडल्यास रुग्णालयामध्ये नेणे, स्पंजिग करणे, अंघोळ घालणे, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडून व्यायाम करून घेणे ही कामे दीपक आनंदाने करीत आहे. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता गेल्या तीन वर्षांपासून त्याची ही सेवा अविरतपणे सुरू आहे.नर्सिंगच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करणाऱ्या आईच्या प्रेरणेने दीपकनेसुद्धा हेच सेवेचे व्रत हाती घेतले आहे. वृद्ध व्यक्तींना, रुग्णांना अंथरुणातून उठविणे, त्यांना व्यवस्थित बसण्यापासून ते अंघोळ घालणे, जेवणाची काळजी घेणे या गोष्टी कराव्या लागतात. असा आहे दीपक... देवकर पाणंद परिसरात राहणारा दीपक पदवीचे शिक्षण घेत आहे. त्याने आतापर्यंत जवळपास ३०० हून अधिक रुग्ण व ज्येष्ठ व्यक्तींची सेवा केली आहे. स्वखुशीने कोणी मदत केली तर स्वीकारतो. रुग्ण व वयस्कर व्यक्तींना एकाच छताखाली सेवा देण्यासाठी दीपकने माउली केअर सेंटरची स्थापना केली आहे. या सेंटरच्या माध्यमातून अशा अनेक रुग्णांना सेवा देण्याची त्याची धडपड सुरू आहे. मला या गोष्टीसाठी संजीव कुलकर्णी आणि अभय कुलकर्णी या दोघांकडून प्रेरणा मिळाली आहे. यासाठी माझ्या आईची मला नेहमी साथ असते. आयुष्यभर मी रुग्ण व वयोवृद्ध व्यक्तींसाठी काम करण्याचे निश्चित केले आहे. - दीपक कदम