शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ईराणी खाणीत वृद्धाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:16 IST

कोल्हापूर : रंकाळा तलावनजीकच्या ईराणी खाणीत एका वृद्धाने उडी मारून आत्महत्या केली. बाळासाहेब तुकाराम माळी (वय ६३, रा. शिवगंगा ...

कोल्हापूर : रंकाळा तलावनजीकच्या ईराणी खाणीत एका वृद्धाने उडी मारून आत्महत्या केली. बाळासाहेब तुकाराम माळी (वय ६३, रा. शिवगंगा कॉलनी, मोरे-मानेनगर, साळोखेनगर, कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाच्या रेस्क्यू पथकाच्या वतीने पाण्यात शोधमोहीम राबवली, पण रात्री उशिरापर्यंत मृतदेह हाती लागला नाही. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

पोलिसांनी व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, रंकाळा तलावाच्या पिछाडीस असलेल्या ईराणी खाणीत सायंकाळी अज्ञाताने धावत येऊनच उडी टाकली. यादरम्यान काही लोक खाणीच्या कठड्यावर बसले होते, त्यांच्या समोरच खाणीत उडी मारली. त्यामुळे गोंधळ उडाला. दरम्यान विक्रमनगर येथील ललित शिंदे या तरुणाने धाडसाने पुढे होऊन बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण काही मिनिटांचा उशिर झाल्याने त्यांना वाचवण्यात अपयश आले. काहींनी अग्निशामक दलाला कळविले, त्यांच्या रेस्क्यू पथकाने पाण्यात मृतदेहाच्या शोधासाठी तत्काळ मोहीम राबवली. संबंधित आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव बाळासाहेब माळी असल्याचे रात्री उशिरा समजले. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे रेस्कू पथकाची शोधमोहीम सुरुच होती. अंधार पडल्याने शोध मोहिमेत अडचणी येऊ लागल्याने शोध मोहीम थांबवली.

दरम्यान, घटनेनंतर खाणीच्या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या घटनेची जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.