शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका शाळेत आठवीचा वर्ग सुरू होणार

By admin | Updated: May 8, 2017 00:59 IST

नगरपालिका शाळेत आठवीचा वर्ग सुरू होणार

कागल नगरपालिका सभा : स्पर्धेत टिकून राहण्यासाठी धोरणात्मक निर्णयलोकमत न्यूज नेटवर्ककागल : कागल नगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने नगरपरिषद शाळेमध्ये इयत्ता आठवीचा वर्ग सुरू करण्याचा निर्णय नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. येथील हिंदुराव घाटगे विद्यामंदिर येथे येत्या शैक्षणिक वर्षापासून हा वर्ग सुरू करण्याचा मानस आहे. तसेच त्यानंतर नववी, दहावीसाठीही परवानगी घेण्यात येणार आहे. कागल नगरपरिषदेच्या शहरात प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते. पूर्वी जिल्हा परिषदेकडे असणाऱ्या या शाळा नगरपरिषद शिक्षक मंडळाकडे वर्ग होऊन हे मंडळ कामकाज पाहत होते. आता शासनाने शिक्षण मंडळ ही संकल्पना बरखास्त केली आहे. नगरसेवकांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. कागल शहरात चार विद्यालये, दोन इंंग्लिश मीडियम शाळा तसेच खासगी प्राथमिक शाळा तीन यांच्याशी स्पर्धा करीत हे नगरपरिषदेच्या शाळा अजून टिकून आहेत. कारण शहरातील ‘नाही रे’ वर्गातील गोरगरीब मुले येथे मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतात. शासनाने पहिली ते आठवी हे शिक्षण ‘प्राथमिक’ म्हणून गणले असल्याने याचा विचार करून हा वर्ग सुरू करण्यावर चर्चा सुरू आहे. तसेच खासगी शिक्षण संस्था इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी विद्यार्थी जादा मिळावेत म्हणून पहिलीपासूनच आपल्या संस्थेशी विद्यार्थ्यांना जोडण्याचे धोरण राबवीत आहेत. पर्यायाने नगरपालिका शाळेत विद्यार्थी संख्या घटत आहे. त्यामुळे आठवीचा वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला.मान्यवरांचे येथे शिक्षण...नामदार गोपाळकृष्ण गोखले, वसंतदादा पाटील, डॉ. आनंद यादव, एस. एम. मुश्रीफ असे दिग्गज तसेच विद्यमान आमदार हसन मुश्रीफ आणि शहरातील त्यांचे समकालीन विविध मान्यवर या नगरपरिषद शाळेतच प्राथमिक शिक्षणाने समृद्ध झाले आहेत. कागलकरांचा एक विशेष जिव्हाळा या शाळांप्रती आहे. हिंदुराव घाटगे शाळेची इमारत संस्थानकाळातील आहे. मात्र, सध्या येथील आजची पटसंख्या चिंताजनक आहे.