शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

माजी सरपंचासह आठजणांना अटक

By admin | Updated: December 26, 2014 23:52 IST

बेणापुरात मिळकतीची बोगस नोंद : अकरा जणांवर गुन्हा

विटा : खानापूर तालुक्यातील बेणापूर येथे न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठरावाव्दारे एकाची मिळकत दुसऱ्याच्या नावावर नोंद केल्याप्रकरणी बेणापूरचे माजी सरपंच व ग्रामपंचायतीच्या सहा माजी सदस्यांसह आठजणांना विटा पोलिसांनी अटक केली. माजी सरपंच सतीश महादेव सुतार, माजी उपसरपंच रावसाहेब पांडुरंग जाधव, माजी सदस्य मंगेश रामचंद्र धेंडे, महात्मा बाबू कांबळे, संपत पितांबर भोसले, हणमंत विष्णू गोसावी, सौ. कमल शहाजी शिंदे व मिळकत नावावर करून घेणारे विनायक नारायण शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बेणापूर येथील मुख्य फिर्यादी दिलीप अनंत शिंदे यांच्या वडिलांचा विटा न्यायालयात दावा दाखल होता. परंतु, तो दावा रद्द झाल्यानंतर त्या दाव्याचा गैरफायदा घेऊन न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतीचा संबंध भासविण्यासाठी कागदपत्रात फेरफार करून विनायक नारायण शिंदे यांच्या कुटुंबियांना ती मिळकत मिळावी म्हणून दि. ३० डिसेंबर २००२ च्या ग्रामपंचायत मासिक सभेत ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर ही मिळकत विनायक यांचे वडील नारायण शिंदे यांच्या नावे नोंद करण्यात करून मूळ हक्कदार दिलीप शिंदे यांची फसवणूक केली गेली.या घटनेनंतर दिलीप शिंदे यांनी विटा न्यायालयात खासगी दावा दाखल केला. त्यावेळी न्यायालयाने हे प्रकरण चौकशीसाठी विटा पोलिसांकडे सुपूर्द केले. पोलिसांच्या चौकशीअंती विनायक शिंदे, तत्कालीन सरपंच सतीश सुतार, उपसरपंच रावसाहेब जाधव, ग्रामपंचायत सदस्य मंगेश धेंडे, महात्मा कांबळे, संपत भोसले, हणमंत गोसावी, सौ. कमल शिंदे, सौ. ललिता श्रीमंत शिंदे, इंदुताई राजाराम पाटील (सर्व रा. बेणापूर) यांच्यासह ग्रामसेवक बाजीराव गंगाराम चव्हाण (रा. सिध्देवाडी, ता. तासगाव) या ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील सौ. इंदुताई पाटील या मृत असून ग्रामसेवक चव्हाण आजारी आहेत. त्यामुळे पोलिसांनी मुख्य संशयित विनायक शिंदे यांच्यासह माजी सरपंच, उपसरपंच व सहा माजी सदस्यांना अटक करून विटा न्यायालयात न्या. सी. पी. भागवत यांच्यासमोर हजर केले. (वार्ताहर)ग्रामसेवकाचाही सहभागबेणापूर येथील दिलीप अनंत शिंदे यांच्या वडिलांचा विटा न्यायालयात दावा दाखल होता. परंतु, तो दावा रद्द झाल्यानंतर त्याचा गैरफायदा घेऊन न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतीचा संबंध भासविण्यासाठी कागदपत्रात फेरफार करून विनायक नारायण शिंदे यांच्या कुटुंबियांना ती मिळकत मिळावी म्हणून दि. ३० डिसेंबर २००२ च्या ग्रामपंचायत मासिक सभेत ठराव मंजूर करण्यात आला. यात ग्रामसेवकाचाही सहभाग असल्याची फिर्याद देण्यात आली आहे.