शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

गटारीत सापडले आठ महिन्यांचे अर्भक

By admin | Updated: May 28, 2014 01:02 IST

हुपरीतील घटना : अनैतिक संबंधातील शक्य

हुपरी : येथील शिवाजीनगर परिसरातील ‘श्री’ चौकातील दोन हॉस्पिटलांच्या पिछाडीस असलेल्या गटारीमध्ये अपूर्ण वाढ झालेले सात-आठ महिन्यांचे पुरुष जातीचे अर्भक सापडले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून ‘अर्भक’ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या घटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, यळगूड-हुपरी रोडवरील ‘श्री’ चौक परिसरामध्ये असणार्‍या आॅर्थोपेडिक हॉस्पिटलच्या मागे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सध्या बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. या इमारतीच्या पाठीमागे असणार्‍या सुमारे पाच फुटाच्या भंगी बोळातून वाहणार्‍या गटारीमध्ये सात-आठ महिन्यांचे अपूर्ण वाढ झालेले पुरुष जातीचे अर्भक अज्ञातांनी टाकून दिल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती बघता-बघता शहरामध्ये सर्वत्र पसरली. त्यामुळे हे अर्भक पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काहींनी पोलिसांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी पंचनामा करून अर्भक ताब्यात घेतले. शवविच्छेदनासाठी अर्भक सी.पी.आर.मध्ये पाठवून दिले. हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्मास आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच पोलीस तपासास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती पोलिसांतून देण्यात आली. (वार्ताहर)