शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आठशे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 28, 2016 00:11 IST

ठिबक सिंचन योजना : कागल तालुक्यातील २१५ लाभार्थ्यांना अनुदान मंजूर

जहाँगिर शेख -कागल दिवसेंदिवस पाणीसाठा कमी होत चालला असल्याने ‘पाणी वाचवा’ ही मोहीम सर्वत्र मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. शेतीसाठीही पाणी देण्याबद्दल वेगवेगळे उपाय योजले गेले आहेत. त्यामध्ये ‘ठिबक सिंचन’ या योजनेला महत्त्व देण्यात आले आहे. त्यासाठी शासनाने ५० टक्के अनुदानही सुरू केले. असे असताना सन २०१३-२०१४ या मागील वर्षात कागल तालुक्यातील २१५ शेतकऱ्यांना ठिबक सिंचन अनुदान मंजूर होऊन देखील त्यापैकी ५४ जणांनाच हे अनुदान मिळाले आहे. १६१ शेतकरी गेली तीन वर्षे अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास ८०० शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे समजते.२०१३-२०१४चे हे अनुदान आलेले नसताना २०१४-२०१५ आणि चालू वर्ष २०१५-२०१६ साठी मात्र नव्याने मंजुरी मिळत शेतकऱ्यांना हे अनुदान आले आहे. मग २०१३-२०१४ चे अनुदान न देण्यामागे नेमके कारण काय? असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांमधून उमटत आहे. २०१३ मध्ये ठिबक सिंचन कंपन्यांच्या विक्री प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या दारी जाऊन त्यांना ठिबक सिंचन करण्यास प्रवृत्त करून सर्व कागदपत्रांची पूर्तता, बँक कर्ज, शासन प्रस्ताव, ठिबक सिंचन यंत्रणा यांचा पुरवठा केला आहे. यामुळे कागल तालुक्यात त्यावर्षी २१५ इतके शेतकरी ठिबक सिंचन पद्धत वापरत होते. शासनाचे १० टक्के अनुदान मिळणार यामुळे बँकांचे कर्ज घेतले. एकरी ४५ हजार रुपये खर्च केला. मात्र, गेली तीन वर्षे हे अनुदानच आले नाही.कागल तालुक्यातील या शेतकऱ्यांचे जवळपास ३० ते ३५ लाख रुपयांचे हे अनुदान थांबले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता हा आकडा मोठा आहे. २०१४-२०१५ या वर्षात झालेल्या ठिबक सिंचनाचे अनुदान थकीत असताना २०१३ मधले हे अनुदान थांबविले आहे. लाभार्थी शेतकरी कृषी विभागाकडे सातत्याने हेलपाटे मारीत आहेत. थकीत अनुदान त्वरित वर्ग करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.२०१३-२०१४ मध्ये ठिबक सिंचनासाठी अल्प अनुदान आल्यामुळे २१५ पैकी ५४ जणांना कागल तालुक्यात हे अनुदान मिळाले. उर्वरित लोकांच्या अनुदानासाठी आम्ही सातत्याने मागणी करीत आहोत. आमच्याकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. जिल्ह्यातही यावर्षी अशी परिस्थिती आहे.-संजय वाघमारे, कागल तालुका, कृषी अधिकारी.शेतकऱ्यांनी संपर्क साधावायेथील दि कागल को-आॅप. बँकेचे उपाध्यक्ष आप्पासाहेब भोसले म्हणाले की, २०१३-१४ मध्ये आम्ही कर्जे काढून ठिबक सिंचन केले आहे. मात्र, केवळ आज, उद्या असे आश्वासनच दिले आहे. अनुदानाची रक्कम आली नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आता अनुदानासाठी संघटित प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे कागल तालुक्यातील आणि जिल्हास्तरावरील संबंधित शेतकऱ्यांनी संपर्क साधावा. दरम्यान, पुढील दिशा ठरविण्यासाठी कागलमध्ये बैठक घेण्यात येणार आहे.