बापुसो यशवंत पाटील दूध संस्था, अंबप वाहनधारक पतसंस्था, अंबप विकास संस्था या संस्थेमार्फत यात्रेनिमित्त आठ लाख पन्नास हजार एकशे आठ रुपयांचा फरक बिल, डिव्हिडंड व ठेव व्याजचे वाटप दूध संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजवर्धन पाटील, विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. के. पाटील, पतसंस्थेचे अध्यक्ष सोमराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महादेव सुरवशी, दादासाहेब पाटील, विश्वास शिंदे, लाडू माळकरी, विठ्ठल दाभाडे, हिंदूराव कांबळे, राजेंद्र कानडे, संजय पाटील, ज्ञानदेव डोंगरे, प्रदीप पाटील, सुदाम पाटील, जालिंदर पाटील, अनिल शिंदे, तानाजी वाघमोडे, कुमार घेवारी, विजय पाटील, गोरख बल्लाळ, पोपट हिरवे, सतीश माळी, गजानन डोंगरे, अनिल शिंदे, राजाराम शिंदे, महादेव गायकवाड, अनिल डोंगरे, शशिकांत पाटील, शिवराज पाटील उपस्थित होते.
फोटो : १५ अंबप लाभांश
ओळी : अंबप (ता. हातकणंगले ) यात्रेनिमित्त बापुसो यशवंत पाटील सहकार समूहामार्फत लाभांश वाटप करताना दूध संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजवर्धन पाटील. सोबत डॉ. बी. के. पाटील व इतर.