शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘बेटी बचाओ’ कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा

By admin | Updated: January 8, 2015 00:46 IST

राजाराम माने : राष्ट्रीय बालक लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी असणाऱ्यांत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश

कोल्हापूर : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काटेकोर नियोजन करून सकारात्मक परिणामांसाठी प्रयत्न करावेत व राष्ट्रीय बालक लिंग गुणोत्तराचे प्रमाण गाठावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी आज, बुधवारी येथे संबंधितांना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. आडसूळकर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर, सरकारी वकील अ‍ॅड. दिलीप मंगसुळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.राष्ट्रीय बालक लिंग गुणोत्तराचे प्रमाण ९१८ पेक्षा कमी असणारे देशात १०० जिल्हे असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील १० जिल्ह्णांचा समावेश आहे. त्यांतील एक कोल्हापूर जिल्हा आहे. २०१४-१५ ते २०१६-१७ या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य विभागांमार्फत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचे संनियंत्रण पंतप्रधान कार्यालयाकडून होणार आहे. जिल्हाधिकारी म्हणाले, मुलगाच व्हावा, या हट्टापायी औषधे घेतल्याने त्याचे विपरीत परिणाम होतात. मुलगा वा मुलगी हा विचार न करता पालकांनी सुदृृढ बालकाचा विचार करावा. बहुतांश माता मुलींना भेदभावाची वागणूक देतात. ती थांबविणे गरजेचे आहे. मुली सबला व्हायला हव्यात. यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर कृती आराखडा तयार करावा. देश विकासाची वाटचाल करीत असताना मानवाला मूलभूत गरजांसाठी झगडावे लागत असल्याबाबतची खंत अविनाश सुभेदार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, हजारो वर्षांची पुरुषप्रधान मानसिकता बदलण्याची गरज आहे. पुरुषी अहंकार, स्त्रियांना दुय्यम स्थान, स्त्रीभ्रूणहत्या यांना स्त्रियांनी विरोधच केला पाहिजे. किरण कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. विस्तार अधिकारी (आरोग्य) विष्णुपंत भोसले यांनी सूत्रसंचालन केले. विलास देशमुख यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)तक्रारीसाठी टोल क्रमांक कार्यान्वितडॉ. बी. डी. आडसूळकर यांनी, प्रत्येक तालुक्यासाठी वैद्यकीय अधीक्षक यांची समुचित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगितले. दर तीन महिन्यांनी सोनोग्राफी सेंटर तपासणी, ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यांतर्गत दाखल झालेले गुन्हे व त्यांवरील कार्यवाही, तक्रारीसाठी ‘१८००२३३४४७५’ हा टोल क्रमांक कार्यान्वित केल्याची माहितीही सादरीकरणाद्वारे दिली.