शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

पेंडाखळेच्या खुरप्यांची ‘धार’च न्यारी

By admin | Updated: March 19, 2017 23:40 IST

महाराष्ट्रातून मागणी : शंभराहून अधिक तरुण व्यवसायात; मशिनरीच्या वापराने पारंपरिक व्यवसायाला आधुनिक लूक-- लोकमत संगे जाणून घेऊ

कोल्हापूर जिल्ह्यास जसा जाज्वल्य इतिहास आहे, तसा या जिल्ह्याचा भूगोलही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या जिल्ह्यात अशी अनेक गावे आहेत, की त्यांचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. ‘लोकमत’ने गतवर्षी जिल्ह्यातील चांगल्या सांस्कृतिक संस्थांची ओळख वर्षभर करून दिली. यावर्षी त्याच मालिकेत ‘लोकमत‘ अशा वेगळ््या वाटेने जाणाऱ्या गावांची महती उलगडून सांगणार आहे. प्रत्येक सोमवारी या सदरात एक न्यारे गाव तुम्हाला भेटायला येईल..राजाराम लोंढे -- कोल्हापूरअस्सल पोलादाचा वापर, धार लावण्याची खासियत व टिकाऊपणा यांमुळे शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळेच्या खुरप्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अक्षरश: भुरळ घातली आहे. गेल्या साठ-सत्तर वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या खुरप्यांच्या व्यवयायाला सध्या आधुनिक ‘लूक’ आला असून, या व्यवसायामध्ये गावातील शंभराहून अधिक तरुण गुंतले आहेत. उत्तम खुरपी करणारे गाव अशी या गावाची ओळख महाराष्ट्रात रुजली आहे. शाहूवाडी तालुका डोंगरकपारींतच वसला आहे. बाजारभोगावपासून पुढे गेले की, कासारी नदीपलीकडे पेंडाखळे गाव लागते. शाहूवाडी तालुका एका बाजूला पसरलेला आणि दक्षिणेकडे ‘घुंगूरचा कडा’ या डोंगराच्या पायथ्याशी हे छोटे गाव वसले आहे. तसा तालुक्याशी फारसा संपर्क येत नसल्याने कामानिमित्त या गावाला बाजारभोगाव, कोल्हापूरवरच अवलंबून राहावे लागते. गावची लोकसंख्या १७८०. त्यापैकी सुतारवाडीत २० कुटुंबे राहतात. सुतारवाडीत गेल्या ७० वर्षांपासून खुरपी तयार केली जातात. कोल्हापूर, मलकापूर, शिराळा येथून जुन्या बाजारांत चारचाकी गाड्यांचे कमानपाटे खरेदी करायचे आणि त्यापासून खुरपी करण्याचा व्यवसाय सुरू आहे. या पाट्यांचे साडेपाच, सहा, आठ इंचांचे तुकडे करून खुरपी तयार केली जातात. पूर्वी हाताने ओढायच्या भात्यातून पोलादाचे तुकडे गरम करून त्याला घणाने खुरप्याचा आकार दिला जायाचा. त्यामुळे एक खुरपे करण्यास वेळ लागायचा. साधारणता पाटा तोडण्यापासून खुरप्याला लाकडी मुठ बसवून धार लावेपर्यंत (पाणी देणे) आठवड्याला तीस खुरपी व्हायची. दणकट व टिकाऊपणामुळे पेंडाखळेची खुरपी शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली. एकदा खुरपे खरेदी केले की पाच-सहा वर्षे नवीन घ्यावे लागत नसल्याने येथील खुरप्यांना मागणी वाढत गेली. संपूर्ण महाराष्ट्रात ‘पेंडाखळेचे खुरपे’ प्रसिद्ध झाले. आजही या खुरप्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. या व्यवसायात आता तरुण पिढी उतरली असून त्यांनी आधुनिकता आणण्याचा प्रयत्न केला. दिवसभर गरम पोलादाला घण मारत बसण्यापेक्षा येथील तरुणांनी यांत्रिकीकरणाचा आधार घेतला. टाकाऊ स्क्रॅपपासून त्यांनी विद्युत मोटारीवर चालणारा घण तयार केला. त्याचबरोबर हाताने भाता फुलविण्याऐवजी तिथे विद्युत मोटरीच्या साहाय्याने भाता फुलविल्याने पोलाद लवकर तापते. एका युनिटवर तीन तरुण काम करतात. पूर्वी आठवड्याला तीस खुरपी पूर्ण व्हायची; पण आता त्यात गतिमानता आली असून दिवसाला तीस खुरपी केली जातात. कोपार्डे (ता. करवीर) येथील जनावरांच्या आठवडी बाजारात काही सुतारबांधव खुरपी घेऊन विक्रीसाठी जातात; पण बहुतांश खुरप्यांची विक्री ही जाग्यावरूनच विक्री होते. कोल्हापूरसह कऱ्हाड, सांगोला, आटपाडी, पंढरपूर, सांगली, पुणे, नाशिक येथून खुरप्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कसदार पाणीच ‘धारे’ची जादू!कोणत्याही खुरप्याची धार ही त्याला तो कारागीर पाणी कसे देतो त्यावरच अवलंबून असते. येथील सुतार बंधंूना याबाबत विचारले असता, डोंगरकपारीतून येणारे पाणी आम्ही धार देण्यासाठी वापरतो. या पाण्याचा वेगळा गुणधर्म असल्याने खुरप्याचा कितीही व कसाही वापर केला तरी त्याची धार जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाच वर्षांची गॅरंटीखुरपे वापरणाऱ्या शेतकऱ्याने निसण्यावर रोज चोळणी व्यवस्थित केली तर किमान सहा वर्षे पुन्हा पाणी देण्याची गरज भासत नाही. धारेला खुरपे वाकले तर ते बदलून दिले जाते.पाणी कसे देतात ?४खुरप्याला लाकडी मूठ घातल्यानंतर शेवटची प्रक्रिया म्हणजे पाणी देणे. ही प्रक्रिया अतिशय जागरूकतेने करावी लागते. खुरपे मध्यम गरम करून त्यावर हळूहळू पाणी ओतल्यास तीक्ष्ण अशी धार येते; पण पोलाद जादा गरम झाले तर खुरप्याचे तुकडे पडतात. त्यामुळे खुरप्याला दिलेले तापमान व पाण्याचे प्रमाण यांचा ताळमेळ घालूनच पाणी द्यावे लागते. दृष्टिक्षेपात पेंडाखळेकुटुंबे-२३१लोकसंख्या-१७८०महिलांची संख्या-८२५ग्रामदैवत-विठलाईदेवीएकूण क्षेत्र-२५० हेक्टर (बागायत)व्यवसाय-शेती, दुग्ध व्यवसाय व खुरपी तयार करणेदूध संस्था-२प्रतिदिनी दूध उत्पादन-१ हजार लिटरप्राथमिक शिक्षण-गावातचमाध्यमिक -माळापुडेसाक्षरतेचे प्रमाण-९० टक्केशासकीय नोकरांची संख्या-१ तलाठी, १ वनपाल, १ वनमजूर, १ ग्रामसेवक, २ शिक्षक, २ साखर कामगार.गावातील साक्षरतेचे प्रमाण खूप चांगले असले तरी शेती, दुग्धव्यवसाय व सुतारकामातच अधिक लोक कार्यरत आहेत. ‘खुरप्यांचे गाव’ म्हणून आमची ओळख असली तरी येथील कारागिरांनी आतापर्यंत ही ओळख जिवंत ठेवण्याचे प्रामाणिक काम केले.- सुनीता युवराज पाटील, सरपंच, पेंडाखळेपारंपरिकतेला थोडीशी आधुनिकतेची जोड देऊन व्यवसाय सुरू असला तरी गुणवत्तेबाबत कोठेही तडजोड केली जात नाही. कोळशाच्या तुटवड्यामुळे या व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या आहेत. - गजानन सुतार, कारागीरआतापर्यंत आम्ही प्रामाणिकपणे हा व्यवसाय टिकवून धरला. आता तरुण मुले यामध्ये उतरली आहेत. आधुनिक यंत्रामुळे खुरपी तयार करण्याचा वेगही वाढला आहे. - महादेव लोहार, कारागीर