शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सहवीज प्रकल्पातून कारखान्याला आर्थिक बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:40 IST

दत्ता लोकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कसरवडे : बिद्री येथील दुधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक पार्श्वभूमीवर महालक्ष्मी आघाडीचे प्रमुख, ‘बिद्री’चे माजी अध्यक्ष के. पी. पाटील यांनी कारखान्यात गेल्या दहा वर्षांत केलेल्या हिताच्या कारभाराचा ‘लोकमत’च्या खास मुलाखतीवेळी चढता आलेख मांडला. ते म्हणाले गेल्या दहा वर्षांत सातत्याने ऊस ऊत्पादकांना उच्चांकी दर तसेच कारखान्याच्या ...

दत्ता लोकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कसरवडे : बिद्री येथील दुधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक पार्श्वभूमीवर महालक्ष्मी आघाडीचे प्रमुख, ‘बिद्री’चे माजी अध्यक्ष के. पी. पाटील यांनी कारखान्यात गेल्या दहा वर्षांत केलेल्या हिताच्या कारभाराचा ‘लोकमत’च्या खास मुलाखतीवेळी चढता आलेख मांडला. ते म्हणाले गेल्या दहा वर्षांत सातत्याने ऊस ऊत्पादकांना उच्चांकी दर तसेच कारखान्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा सहवीज प्रकल्प उभारला.विरोधकांनी अनंत अडचणी निर्माण केल्या. मात्र, त्यावर मात करून हा प्रकल्प उभारला. त्यामुळेच कारखाना अधिकच आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. गाळप क्षमता ७५०० मे. टन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येईल. यापुढेही सभासदांना उच्चांकी दर देत विमा संरक्षण देऊन कारखान्याच्या ऊस उत्पादकांचे हित हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितले.गेल्या शतकापूर्वी आमच्या हाती सभासदांनी मोठ्या विश्वासाने सत्ता दिली. साखर कारखानदारीसमोर अनेक अडचणी येत असताना त्यावर मात करून ऊस उत्पादकांना घामाचे दाम देण्याचे काम केले आहे. त्या परिस्थितीत कोट्यवधी रुपयांच्या कर्जात असणारा कारखाना कर्जमुक्त केला. शिवाय सातत्याने उच्चांकी दर देण्यात अग्रभागी राहिलो. या कालावधीत ऊसदराबाबत अनेकदा कोंडी निर्माण होत होती. ती कोंडी फोडण्याचा प्रश्न ज्या ज्यावेळी निर्माण झाला, त्या त्या वेळी शेतकºयांच्या हितासाठी ऊसदर जाहीर करून कोंडी फोडण्याचे काम आम्ही केले.रोजंदारीच्या कामगारांसंबंधी बोलताना ते म्हणाले, कारखान्याच्या गळीत हंगामात तात्पुरत्या कर्मचाºयांची गरज भासते. त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकºयांच्या मुलांना रोजंदारीच्या कामावर घेतले जाते. हा निर्णय संस्थेच्या गरजेसाठी घेतला जातो. मात्र, काही मंडळी बोगसगिरी म्हणतात, हे योग्य नाही. आरोप करणारी मंडळीसुद्धा एकेकाळी या कारखान्यावर कार्यकर्त्यांना रोजंदारीच्या कामासाठी पाठवत होते.यापुढे सभासदांना उच्चांकी दर, याचबरोबरच उत्पादन वाढीसाठी भरीव स्वरूपाची मदत, गाळप क्षमता ७५०० मे. टन करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उभारणी, तोडणी कार्यक्रम अ‍ॅपद्वारे संगणकीकरण करून मोबाईलद्वारे सभासदांना कळवीत सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.सहवीज प्रकल्पाच्या मुद्द्याला हात घालताना ते म्हणाले, ऊर्जाअंकुर योजनेनुसार वीज प्रकल्प भाडेतत्त्वावर उभारणे हे कारखान्याच्या हिताचे ठरणार नसून, कारखान्याच्या सभासदांच्या मालकीचा सहवीज प्रकल्प उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यासाठी केंद्र व राज्य पातळीवरील वित्तीय संस्थांची मदत घेतली. मात्र, विद्युत वाहिनी टॉवरना विरोधकांनी विरोध केला. यामुळे कोटीत तोटा सहन करावा लागला. या प्रकल्पामुळे कारखाना डबघाईस येईल, कारखान्यावर पत्रेसुद्धा राहणार नाहीत, असा आरोप ही मंडळी करत होती. मात्र, आता या प्रकल्पामुळे आर्थिक सुबत्ता आली अशी दुटप्पी भूमिका घेणाºया विरोधकांना सभासद त्यांची जागा या निवडणुकीत दाखवतील.