शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पाऊसधारांत बाप्पाला पर्यावरणपूरक निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:34 IST

कोल्हापूर : पुन्हा एकदा अतिवृष्टीच्या धारा आणि पुराची टांगती तलवार सोसत कोल्हापूरकरांनी शनिवारी घरगुती गौरी-गणपतीला निरोप दिला. विधायक गणेशोत्सवाच्या ...

कोल्हापूर : पुन्हा एकदा अतिवृष्टीच्या धारा आणि पुराची टांगती तलवार सोसत कोल्हापूरकरांनी शनिवारी घरगुती गौरी-गणपतीला निरोप दिला. विधायक गणेशोत्सवाच्या आदर्शांची पुनरावृत्ती करीत नागरिकांनी विसर्जन कुंडात गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. कोल्हापूर जिल्ह्यातून दोन लाख ३२ हजारांहून अधिक, तर शहरातून ५० हजारांहून अधिक अशा जवळपास तीन लाखांहून अधिक गणेशमूर्तींचे काहिलीत विसर्जन झाले, तर १०० टक्के निर्माल्य दान झाले.शनिवारी दुपारपासून पावसाने क्षणभरही उसंत घेतली नाही. मात्र धो-धो कोसळणारा पाऊसही गणेशभक्तांचा उत्साह कमी करू शकला नाही. पुन्हा महापुराची भीती आणि अतिवृष्टी सहन करीत नागरिक बाप्पांना निरोप देण्यासाठी बाहेर पडले. कोल्हापूर शहरात सर्वाधिक गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीघाटावर होते. मात्र शनिवारी सकाळी गायकवाड वाड्यापर्यंत आलेले पंचगंगेचे पाणी दुपारपर्यंत जामदार क्लबजवळ आल्याने यंदा नदीघाटावर नागरिकांना गणेशमूर्तींचे विसर्जन करता आले नाही. त्यामुळे गायकवाड वाड्याजवळ विसर्जन कुंड ठेवण्यात आले. पंचगंगेला पूर आल्याने गणेशमूर्ती विसर्जनाचा भार यंदा रंकाळ्याने पेलला. जथ्थेच्या जथ्थे गणेशमूर्ती हातगाड्या, दुचाकी, चारचाकीतून व चालत घेऊन येत होते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रहदारी तुंबली. यासह राजाराम बंधारा, रंकाळा, इराणी खण, कळंबा, राजाराम तलाव, कोटीतीर्थ येथेही विसर्जन कुंड, निर्माल्य कुंड आणि ट्रॅक्टर-ट्रॉलींची सोय करण्यात आली होती.