शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोंघेत पन्नास वर्षांपासून इको-फ्रेंडली गणेशोत्सव

By admin | Updated: September 10, 2016 00:54 IST

शाडूच्या मूर्ती बसविण्याचा गावकऱ्यांचा निर्णय : घरगुती, सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींना रंग नाही

चंद्रकांत पाटील --गगनबावडाअलीकडे प्रदूषणप्रश्नी सर्वसामान्यांमध्येही मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. त्यामुळे ‘इको-फ्रेंडली’ चळवळ तळागाळापर्यंत रूजू लागली आहे. पण गगनबावडा तालुक्यातील अख्खं गावच ‘इको-फ्रेंडली’ आहे हे सांगूनही पटणार नाही, पण असे गाव आहे. ते गाव म्हणजे लोंघे. लोंघेकरांची ही इको-फ्रेंडली परंपरा एक-दोन वर्षांची नव्हे तर तब्बल ५० हून अधिक वर्षांपासून सुरू आहे.घरोघरी गणपतीची मूर्ती रंगीत न बसविता फक्त शाडूच्या मूर्ती बसविण्याचा निर्णय सर्व गावाने घेतला व आजपर्यंत परंपरा अखंडितपणे सुरू आहे. लोंघे गावचा आदर्श जिल्ह्याला मार्गदर्शक ठरला आहे. येथे घरोघरी व मंडळाच्या माध्यमातून गणपतीच्या रंगीत मूर्तीची प्रतिष्ठापना न करता शाडूच्या न रंगविलेल्या गणेशमूर्तीची पूजा केली जाते, हे एक वेगळेच वैशिष्ट्य म्हणावे लागेल.कोल्हापूरपासून अवघ्या २५ ते ३० कि. मी. अंतरावर कुंभी-कासारी काठावर हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावाने संस्कृतीची परंपरा जपत अभिनव उपक्रम राबवला आहे. सेवाभावी संस्था, राज्य शासनाने दखल घ्यावी, असेच चांगले कार्य या गावाने केले आहे, याचे सर्व श्रेय जुन्या-जाणत्या वर्गालाच द्यावे लागेल, यात शंका नाही. अफाट दूरदृष्टी असलेल्या या जुन्या मंडळीनी गावाला पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले असून त्याचे पालनही आजपर्यंत तरी चांगल्याप्रकारे होत आहे. गणेशोत्सवामुळे येथे कायम एकोपा नांदत आहे, हे या गावचे वैशिष्ट्य आहे. गावात गणेशाची मूर्ती पूर्णपणे चिखलमातीची बनविल्यामुळे कोणत्याही रासायनिक घटकांचा समावेश केलेला आढळून येत नाही. दोन महिने मातीसाठी प्रयत्न करूनही बनविलेल्या चिखलापासून मूर्तीची निर्मिती केली जाते. या मूर्ती नदी, विहिरींमध्ये विसर्जित केल्या तरी प्रदूषण होत नाही.जलप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, जलप्रदूषण थांबले नाही तर गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल. असे असताना इतर गावांनी लोंघे गावचा आदर्श घेणे गरजेचे आहे. वास्तवत: रुढी परंपरा यांना धक्का न लावता पुरोगामी विचाराने ही परंपरा गावाने राखली असून शाडूच्या मूर्ती (न रंगविलेल्या) गावात निर्माण करून ग्रामस्थांनी आपल्या घरोघरी पूजन करून सर्वच गणेशभक्तांना एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.