निसर्गरम्य तालुक्यात अनेक कृत्रिम तलाव आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जनामुळे जलस्रोत दूषित होत आहेत. हे लक्षात घेऊन या हायस्कूलच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी लोकांच्या श्रद्धेला धक्का न लावता पर्यावरणपूरक विसर्जनाचा संदेश देत आहेत. यावर्षी शाळेच्या जलकुंडात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा केले.
यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. या पुढील काळात अमोनियम बायकार्बोनेट पंचायत समिती वित्त आराखड्यात ग्रामपंचायतीला उपलब्ध करून लोकचळवळ उभी करण्याचा मानस व्यक्त केला. कायमस्वरूपी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केलेले यु. एस. कपिलेश्वरी , निंगाप्पा आवडण, विद्यार्थी निवृत्ती वर्पे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक एल. पी. पाटील यांनी विद्यालयातील चार निराधार मुलांचा शैक्षणिक खर्च उचलत ‘निराधारांचे होऊ बाप्पा’ हा संदेश दिला.
या कार्यक्रमास पं. स. चंदगडचे ठोंबरे, किरण पाटील, बसर्गेचे शाहू पाटील, शाळा समितीचे अध्यक्ष निंगाप्पा आवडण, मुख्याध्यापक जी. व्ही. गावडे, मुख्याध्यापक एन. एस. पाटील, एस. बी. पाटील, प्रकाश नाईक, शशिकांत गावडे, पुंडलिक पाटील, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील, सचिव प्रा. विक्रम पाटील, सहसचिव डॉ. दीपक देसाई, प्रा. एम. बी. निर्मळकर, समता प्रतिष्ठानचे डॉ प्रदीप देवण यांचे सहकार्य लाभले.
फोटो ओळी : गुडेवाडी येथे स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जलकुंडात गणेशमूर्तींचे विसर्जन केले.
क्रमांक : १७०९२०२१-गड-०१