शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शाळी नदीसही प्रदूषणाचे ग्रहण

By admin | Updated: March 24, 2015 00:10 IST

पाण्याला दुर्गंधी : दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

राजाराम कांबळे - मलकापूर शहराजवळून वाहणाऱ्या शाळी नदीच्या पाण्याचे प्रदूषण झाले आहे. शाळी नदीचे पाणी काळेकुट्ट झाले आहे. पाण्याला उग्र वास येत असून, मलकापूर, उचत, माण, परळे कोपार्डे, येळाणे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे नदीकाठची शेतीही धोक्यात आली आहे. पालिकेची नळ पाणीपुरवठा योजना बंद ठेवण्यात आली आहे. पालेश्वर धरणातील पाणी सोडण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.उन्हाळ्यात पालेश्वर धरणातील पाण्याचा विसर्ग कमी होतो. शाळी नदीतील पाण्याचा प्रवाह कमी होतो. शाळी नदीवरील येळाणे येथे पाटबंधारे विभागाच्या वतीने पाणी अडविले जाते. नदीमध्ये मलकापूर शहरातील गटारींचे पाणी, उचत येथील गटारांचे पाणी मिसळते. त्यात नदीकाठावरील गावातील महिला नदीच्या पाण्यामध्ये कपडे धुतात. तसेच शेतकऱ्यांकडून जनावरेदेखील धुतली जातात. पाणी वाहत नसल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे. पाण्याला उग्र वास येत असून, संपूर्ण नदीचे पाणी काळेकुट्ट झाले आहे.शाळी नदीतून दहा गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाण्यासाठी विहीर व कूपनलिकांचा आधार घ्यावा लागत आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली असली तरी शेतीला या पाण्याशिवाय पर्याय नसल्याने काळ्या पाण्यामुळे शेती नापिक बनत आहे.मलकापूर नगरपालिकेने या प्रदूषित पाण्यामुळे शाळी नदीवरील योजना बंद ठेवली आहे. कडवी नदीवरील जॅकवेलवरुन नागरिकांना फिल्टरचे पाणी पुरविले जाते. मात्र, खर्चासाठी नागरिकांना विहीर, कूपनलिका यांचे पाणी वापरावे लागते. शहरातील सर्व गटारींचे पाणी शाळी नदीत मिसळते. पालिकेने यासाठी कोणतीच उपाययोजना केलेली नाही. प्रदूषण मंडळाने या नदीचे पाणी तपासून यावर उपाययोजना करावी व नदीकाठच्या गावांना प्रदूषित पाण्यापासून मुक्ती द्यावी, अशी मागणी नदीकाठच्या गावातील नागरिकांतून होत आहे.पाटबंधारे विभागाने पालेश्वर धरणातून नियमित पाणी सोडावे, तरच पाण्याचा प्रवाह सुरू राहून पाणी दूषित होणार नाही.- बाबासाहेब पाटील, नगराध्यक्षशाळी नदीतील दूषित पाण्यामुळे नदीकाठची शेती धोक्यात आली आहे. पालिकेने उपाययोजना करावी.- राजू प्रभावळकर, शेतकरी.