शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ई-मार्केट प्लस पोर्टल नोंदणीसाठी सुटसुटीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 18:14 IST

कोल्हापूर, दि. ५ : केंद्र शासनाने वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी गव्हर्मेंट ई-मार्केटप्लस हे पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलमुळे खरेदीसाठी ग्राहकांना जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध होणार असून ख्ररेदी प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. तसेच वस्तु व सेवा प्रचलित बाजारभावापेक्षा कमी किंमतीत खात्रीशीररितीने उपलब्ध होणार आहेत.महासंचालक पुरवठा व विल्हेवाट ही दिनांक ३१ ...

कोल्हापूर, दि. ५ : केंद्र शासनाने वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी गव्हर्मेंट ई-मार्केटप्लस हे पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलमुळे खरेदीसाठी ग्राहकांना जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध होणार असून ख्ररेदी प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. तसेच वस्तु व सेवा प्रचलित बाजारभावापेक्षा कमी किंमतीत खात्रीशीररितीने उपलब्ध होणार आहेत.महासंचालक पुरवठा व विल्हेवाट ही दिनांक ३१ आॅक्टोबर पासून बंद होणार असून या संघटनेमार्फत होणारी कार्यवाही ही पोर्टलवर परावर्तित होणार आहे.सर्व शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका/ नगरपालिका/ जिल्हा परिषद/ स्वायतत संस्था/ अंगीकृत संस्था/ शासनाच्या नियंत्रणाखालील असलेल्या सर्व संस्थांना या वेब पोर्टलव्दारे खरेदीची कार्यपध्दती स्विकृत करुन लागू करण्यात आलेली आहे. सर्व संस्थाना या पोर्टलच्या माध्यमातून दि. १ डिसेंबर २0१६ रोजीच्या सुधारित खरेदी धोरणातील तरतुदींचा अवलंब करुन खरेदी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.सध्या या पोर्टलवर २५ हजार ८00 उत्पादक / पुरवठादार नोंदणीकृत झाले असून त्यांच्याकडून १ लाख १३ हजार वस्तू व १७ सेवा या पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

गव्हर्मेंट ई- मार्केटप्लस पोर्टलवर खरेदीदार विभागांना व राज्यातील उत्पादक- पुरवठादारांना नोंदणीकृत होण्यासाठीची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत असून नोंदणी करण्यासाठी पॅन क्र., आधार क्र. इत्यादी बाबी नमूद करुन खरेदीदार विभाग व उत्पादक- पुरवठादार दहा ते पंधरा मिनिटाच्या कालावधीत पोर्टलवर नोंदणीकृत होऊ शकतात.कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आद्योगिक संघटना-औद्योगिक वसाहती व सर्व उद्योजकांनी जास्तीत जास्त उत्पादक व पुरवठादाराना नोंदणीकृत होण्यासाठी योग्य तो प्रचार व प्रसिध्दी करावी.