शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोटींच्या रस्त्यावर मातीचे पॅचवर्क!

By admin | Updated: June 21, 2014 00:27 IST

नगरोत्थान रस्त्यांचे काम खोळंबले : प्रकल्प पूर्ण होण्याआधीच रस्त्यांची चाळण

कोल्हापूर : शहरातील ३८ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १०८ कोटींचा निधी उपलब्ध असूनही गेली चार वर्षे अंतर्गत रस्त्यांचे काम रखडले आहे. ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने ‘निविदा पे निविदा’ असा प्रकार सुरू आहे. काही वर्षांत केलेल्या रस्त्यांची चाळण झाली आहे. ठेकेदारांवर कारवाई न करता महापालिकेने अनेक ठिकाणी माती टाकून पॅचवर्क करण्याचा उद्योग केल्याने नागरिकांतून संताप व्यक्तहोत आहे. ठेकेदारांनी असमर्थता दर्शविल्यामुळे शहरातील अकरा रस्त्यांच्या कामांची चार भागांत विभागणी करून काढलेल्या फेरनिविदेकडेही त्यांनी पाठ फिरविली आहे. रस्त्यांच्या दर्जापेक्षा मला किती मिळाले, हा नियम लावला गेल्याने शहरातील सर्वच रस्त्यांची वाट लागली. आता ठेकेदार मिळत नसल्याने निधी असूनही सुविधा न पुरविण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. पावसाळा सुरू होणार असल्याने प्रकल्प पुन्हा तीन ते चार महिन्यांसाठी रखडणार आहे. सुरुवातीपासूनच या प्रकल्पाकडे ‘आंबा’ म्हणूनच पाहिले. रस्त्यांच्या दर्जाकडे लक्ष दिलेच नाही. वेळीच लक्ष दिले असते, तर प्रकल्प दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाला असता, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. यापूर्वी केलेल्या रस्त्यांची दुरावस्था होण्यास सुरुवात झाली आहे. नियमानुसार रस्त्यांची देखभाल ठेकेदाराने करणे अपेक्षित आहे. ठेकेदार व प्रशासन यांचे संगनमत असल्याने आजपर्यंत खराब रस्त्यांबाबत एकाही ठेकेदारावर कारवाई झालेली नाही. (प्रतिनिधी)